२१ चोरलेल्या दुचाकीसह चोरटा नगर तालुका पोलिसांनी केला जेरबंद मित्र व नातेवाईकांकडे लपवून ठेवायचा गाड्या

२१ चोरलेल्या दुचाकीसह चोरटा नगर तालुका पोलिसांनी केला जेरबंद मित्र व नातेवाईकांकडे लपवून ठेवायचा गाड्या

 

 

नगर प्रतिनिधी:-गर्दीच्या ठिकाणावरून मोटार सायकल चोरणा-या अट्टल गुन्हेगाराच्या नगर तालुका पोलीसांनी मुसक्या आवळून तब्बल २१ मोटरसायकली जप्त करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे.दि. 15 जुलै 2024 रोजी गणेश मंगल कार्यालय,नगर, दौंड रोड,हिवरे झरे ता.जि.अहमदनगर येथून तुकाराम बबन शिंदे (रा.शिंदेवाडी,अरणगाव ता.नगर जि. अहमदनगर) यांची होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल चोरीला गेले बाबत नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.या गुन्ह्याचा तपास पोहेकाँ/2178 राहुल राजेंद्र द्वारके हे करीत होते.नगर तालूका पोलीस स्टेशनचे सपोनि.श्री.प्रल्हाद गिते यांना गोपनिय माहातीदारा मार्फत खात्रीलायक माहीती मिळाली कि,नगर तालूका पोलीस स्टेशन गुरनं 591/2024 मधील मोटार सायकल चोरी ही किशोर जयसिंग पटारे (रा.वडगाव गुप्ता ता.जि.अहमदनगर) याने केली असून तो सध्या स्टेट बँक ऑफ इंडीया चौक,येथे येत असल्याची खात्रीलायक माहीती समजल्याने सपोनि.श्री.गिते यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफ यांना सदर ठिकाणी जावून आरोपी मजकुर यास ताब्यात घेऊन कारवाई करणे बाबत आदेश दिले.पोलिस अंमलदार यांनी तात्काळ रवाना होऊन स्टेट बँक ऑफ इंडीया येथे सापळा लावून आरोपीस ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव किशोर जयसिंग पटारे (रा.महादेव मंदिर जवळ, पिंपळगाव माळवी ता. नगर जि.अहमदनगर हल्ली रा.द्वारका मंगल कार्यालय जवळ, वडगाव गुप्ता ता.नगर जि.अहमदनगर) असे असल्याचे सांगीतले. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने नगर तालूका पोलीस स्टेशन गु र नं 591/2024 भारतीय न्याय संहीता कलम 303(2) ह्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यामधून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली तसेच सदरच्या चोरी केलेल्या मोटार सायकली ह्या माझ्या नातेवाईक व मित्र यांचेकडे लपून ठेवल्या आहेत अशी कबुली दिल्याने आरोपीने सांगीतलेल्या ठिकाणी जावून एकून 21 मोटार सायकली ताब्यात घेतल्या.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संपत भोसले, नगर तालुका सपोनी/ श्री.प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ / दत्तात्रय हिंगडे,पोहेकाँ/शाहीद शेख,पोहेकाँ/राहुल द्वारके,पोहेकाँ/नितीन शिंदे,पोहेकाँ / राहुल थोरात,पोकाँ/संभाजी बोराडे,पोकाँ/राजु खेडकर,पोकाँ/सागर मिसाळ तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकाँ/राहुल गुंडू यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *