दोन हजारांची हजारांची लाच स्वीकारणारा शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचा ठुबे दादा अँटी करप्शनच्या जाळ्या

दोन हजारांची हजारांची लाच स्वीकारणारा शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचा ठुबे दादा अँटी करप्शनच्या जाळ्या

 

 

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.सरकार तर्फे योगेश भाऊसाहेब शिंदे (वय 36 वर्षे), व्यवसाय – नोकरी, पद – पोलिस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी ही कारवाई केली. शनिशिंगणापूर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 26/2026 कलम – भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.आरोपीचे नाव अजय कृष्णा ठुबे असून तो शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे. यातील

तक्रारदार यांचा असा आरोप आहे की,त्यांनी शनिशिंगणापूर मंदिर समोर पूजा साहित्याचे दुकान असणाऱ्या दुकानदारास दरमहा योग्य परवानगीशिवाय वाहन पार्क करू देण्याबाबत कारवाई न करण्यासाठी आरोपी पोलिस शिपाई अजय ठुबे यांनी प्रति महिना 1500/- रुपये घेत होते.मागील महिन्याचा व चालू महिन्याचा असा 2 महिन्यांचे पैसे पोलिस दुकानासमोर वाहन पार्क करू न देण्याचे सांगून मागितले होते. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार नोंदवली.त्यानुसार सापळा रचण्यात आला.सापळा कारवाई दरम्यान आरोपी अजय ठुबे यांनी तक्रारदार यांच्याकडून 3000/- रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर 2000/- रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.सदरची कारवाई श्रीमती माधुरी केदार कांगणे पोलीस अधीक्षक लाच लुचपत विभाग छत्रपती संभाजी नगर,श्री.शशिकांत शिंगारे अप्पर पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.योगेश शिंदे,पोलीस अंमलदार अशोक नागरगोजे, प्रकाश नागरगोजे, रामेश्वर ताटे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *