आयपीएल वर लाखोंचा सट्टा पोलिसांचे दुर्लक्ष

अहिल्यानगर प्रतिनिधी : आयपीएलचे सामने शनिवारपासून सुरू झाले आहेत या सामन्यावर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू आहे.अनेक तरुण ॲपचा आयडी चा वापर करून सट्टा खेळत आहे. आयपीएल मुळे मोठे बुकी मालामाल झाल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

आयपीएलचे सामने सुरू झाल्यापासूनच शहरातील लहान मोठे बुकी सक्रिय झाले आहेत क्रिकेट सामन्यावर शहरात दरवर्षी लाखोंचा सट्टा लावला जातो शहरात मोठ्या बुकींची संख्या मोठी आहे. छोटे बुकी हे थेट ग्राहकांच्या संपर्कात असतात प्रमुख बुकी कडून छोट्या बुकिंगमार्फत थेट ग्राहकांना एक आयडी दिला जातो.

त्या आधारे क्रिकेट सामन्यांवर सट्टा हा लावला जातो. बुकिंगचे शहरासह ग्रामीण भागात मोठे नेटवर्क आहे नेटवर्क चालवणारे मोठे बुकी कोण आहेत याची माहिती पोलिसांना असते यापूर्वी सट्टेबाजार कारवाई झालेले आहेत मध्यवर्ती शहरात बुक्की असून ते सामने सुरू झाले तेव्हापासून सक्रिय झालेले आहेत.यातून दररोज लाखो रुपयांची ओलाडाल होते परंतु याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे गेल्या पाच दिवसात एकही बुकेवर कारवाई झाली नाही. काही अर्थपूर्ण व्यवहारअसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलीस दाखवीत नाही त्यामुळे सट्टा बाजाराची लोन  सर्वत्र पसरत आहे सट्टा लावण्याने कर्जबाजारी झाल्याचे अनेक उदाहरण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *