वांगचुक यांच्या सत्याग्रहाच्या समर्थनार्थ नगरकरांचा उद्या मूक ज्योतीमोर्चा

वांगचुक यांच्या सत्याग्रहाच्या समर्थनार्थ नगरकरांचा उद्या मूक ज्योतीमोर्चा

 

अहिल्यानगर , दिनांक 16 जुलै 2026.वांगचुक यांच्या सत्याग्रहाच्या समर्थनार्थ नगरकरांचा उद्या मूक ज्योतीमोर्चा विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततामय लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी जागृत नगरकरांचा उद्या मूक ज्योतीमोर्चा ( कॅन्डल मार्च ) निघणार आहे. शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले वांगचुक यांच्याशी केंद्र सरकारने त्वरित संवाद करावा आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांना प्रतिसाद द्यावा , अशी मागणी जागृत नगरकर मूक मोर्चातून करणार आहेत.

हा मोर्चा उद्या , शुक्रवार, दि. 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता वाडिया पार्क येथील महात्मा गांधी स्मारकापासून सुरू होईल.माळीवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे हा मोर्चा समाप्त होईल*.

हा भारताच्या लोकशाही मूल्यांवर, संविधानावर आणि शांततामय आंदोलनाच्या अधिकारावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आवाज आहे.

महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेचा अधिकार दिला. त्या दोन्ही महामानवांच्या स्मारकांना जोडणारा हा मौन ज्योती ( कॅन्डल ) मोर्चा म्हणजे लोकशाही मूल्यांना अभिवादन करण्याचा एक सामूहिक संकल्प आहे..

आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि अन्यायाविरुद्ध उभे राहिलो नाही, तर उद्या आपल्या प्रश्नांसाठीही कोणी उभे राहणार नाही.

अहिल्यानगरातील सर्व नागरिक, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा मौन कॅण्डल मार्च यशस्वी करावा, असे आवाहन जागृत नागरिकांनी केले आह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *