_मिंक्स बॉक्सिंग स्टेट असोसिएशन, महाराष्ट्र ची राज्य कार्यकारिणी जाहीर_*

 

 

अहिल्यानगर :रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता वनराई रिसॉर्ट , अहिल्यानगर येथे मिक्स बॉक्सिंग स्टेट असोसिएशनची ही महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या सभेत सन २०२६-३०या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी गठीत करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यातील क्रीडा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मिंक्स बॉक्सिंग स्टेट असोसिएशन, महाराष्ट्र { M.B.S.A.M } च्या राज्याची नुतन कार्यकारिणी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली.

 

अध्यक्ष-अनिकेतभाई तटकरे (रायगड),

कार्याध्यक्ष- श्री.प्रशांत मोहिते( रायगड) ,

उपाध्यक्ष – श्री.रवी बारापात्रे ( नागपूर),

महासचिव – श्री.नारायण कराळे( अहिल्यानगर),

सहसचिव – श्री.विनोद दाढे ( नांदेड) , कोषाध्यक्ष – श्री गणेश पेरे ( बुलडाणा ) , उपकोषाध्यक्ष – श्री.स्वप्निल सोनावणे ( नवी मुंबई)

कार्यकारिणी सदस्य –

श्री.सतीश नाईक ( मुंबई),

सौ.सारिका भालेघाटे (पुणे),

निलेश लंभे,(कोल्हापूर),

श्री.समीर काळे (सातारा),

श्री. आनंद जाधव (नाशिक),

कु.अतेश साळवी (रायगड) ,

श्री.मनोज घेरे (लातूर)

आणि श्री.मयुर लोंढे ( सांगली)

 

या निवडीचा अधिकृत ठराव १ जानेवारी २०२६ रोजीच निश्चित करण्यात आला होता. त्याला आजच्या सभेत अंतिम मंजुरी देण्यात आली. या निवडीसाठी कु.अतेश साळवी यांनी सुचक म्हणून काम पाहिले तर श्री.रवी बारापात्रे यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले.

मिंक्स बॉक्सिंग स्टेट असोसिएशन, महाराष्ट्र ही संस्था इंडियन मिंक्स बॉक्सिंग फेडरेशन , एशियन आणि वर्ल्ड मिंक्स बॉक्सिंग फेडरेशनशी संलग्न असुन भारत सरकारच्या ‘ फिट इंडिया ‘ मोहिमेअंतर्गत कार्यरत आहे.

महासचिव कराळे नारायण यांनी निवडीनंतर बोलतांना सांगितले की, “महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळवून देणे आणि राज्यात मिंक्स बॉक्सिंग या खेळाचा प्रचार व प्रसार करणे हे आमचे मुख्य ध्येय असेल.”

या निवडीबद्दल क्रिडा क्षेत्रातुन सर्व नुतन पदाधिकार्याचे अभिनंदन होत आहे.

मिंक्स बॉक्सिंगचे संस्थापक श्री.राकेश म्हसकर व भारतीय मिंक्स बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षा ना.अदिती ताई तटकरे ( मंत्री-महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य ) यांनी सर्व राज्य कार्यकारिणीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *