छत्रपती अकॅडमीचे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश
*अहिल्यानगर, दि. १७:* गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी *७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य* अशी एकूण १७ पदके पटकावली.
*पदक विजेते खेळाडू:*
*सुवर्ण पदक विजेते -* आराध्या कराळे, आदित्य गरुडकर, गौरव गायकवाड, तनिष्का पाटोळे, सृष्टी लवांडे, अरमान गुलाब पठाण, बिदिप्ता विश्वजित डे
*रौप्य पदक विजेते -* गार्गी झिने, स्वरा कदम, ऋतुजा कदम, अथर्व त्रिंबके, प्रतिक विरकर, श्रेयस पाटोळे, गुंजन धोंडगे
*कांस्य पदक विजेते -* श्रावण भंडारे, अस्मिता दिघे, कोमल काळे
या सर्व यशस्वी खेळाडूंचे विक्रम भगत, सुनिल कराळे, अनिल तोडकर,तेजस रासकर, ओंकार भंडारी,रोहित काळे, कार्तिक काळे ,गणेश भगत,कृष्णा सरोदे यांनी अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना छत्रपती अकॅडमी चे सर्वे सर्वा तसेच मिक्स बाॅक्सिंग राज्य असोसिएशन , महाराष्ट् चे महासचिव नारायण कराळे सर यांनी मार्गदर्शन केले.
छत्रपती अकॅडमीचे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश*
