*स्नेहालय उडान टीमचा निर्धार: बालविवाहमुक्त समाजासाठी प्रत्येक घरोघरी जनजागृती*
_स्नेहालय उडान प्रकल्प, रेडिओ नगर 90.4 एफएम, आणि रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नांतून बालविवाहविरोधी संदेशाचा प्रभावी विस्तार_
जेऊर (बा): नगर तालुका ३० नोव्हेंबर २०२४:स्नेहालय उडान प्रकल्प, रेडिओ नगर 90.4 एफएम, आणि रयत शिक्षण संस्थेचे श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय, जेऊर (बा) यांच्या संयुक्त विद्यमाने “माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा” अभियान व संविधान दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 1100 हून अधिक विद्यार्थी, पालक, आणि पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाले, आणि यावेळी बालविवाहविरोधी संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यात आला.
प्रविण कदम यांचे मार्गदर्शन:
कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालकांचे हक्क, करियर मार्गदर्शन, सेल्फ डिफेन्स, तसेच मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत तत्त्वांची शिकवण दिली. प्रविण कदम यांनी आपली शिक्षण व जीवनाच्या मूल्यांची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या व प्रभावी पद्धतीने दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची प्रेरणा मिळाली.
*संदीप क्षीरसागर यांचे योगदान:*
कार्यक्रमात संदीप क्षीरसागर यांनी स्नेहालय संस्थेच्या उपक्रमांची ओळख करून दिली आणि रेडिओ नगर 90.4 एफएम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला आणि कौशल्य विकसित करण्यासाठी एक प्रभावी मंच मिळवण्याची संधी दिली. “आपला आवाज जगभर पोहोचवू शकतो आणि रेडिओ नगर हे एक उत्तम प्लेटफॉर्म आहे,” असे ते म्हणाले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांचे मुलाखती घेऊन कार्यक्रमाबद्दल कसा वाटला याविषयी अभिप्राय घेऊन त्यांचे अनुभव व्यक्त केले यामध्ये एका मुलाने बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेतला होता व त्याला आलेला अनुभव कसा होता याविषयी त्यांनी व्यक्त झाले. हा संपूर्ण कार्यक्रम उद्या दुपारी एक वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम स्नेह वार्ता या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे सर्वांनी डाउनलोड करून नक्की ऐकावे असेही यावेळी अहावान केले.
*प्राचार्या श्रीमती भोर रोहिणी रमेश यांचे आवाहन:*
कार्यक्रमाच्या उद्घाटनात श्रीमती भोर रोहिणी रमेश, प्राचार्या, श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय यांनी या उपक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका सांगितली. “मी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या शाळेच्या बालविवाह मुक्त शाळा बनवण्यासाठी कार्यरत आहे, आणि मला विश्वास आहे की या कार्यक्रमामुळे नगर जिल्ह्यातील शाळांना एक प्रेरणा मिळेल,” कुठेही बालविवाह होत असल्यास ताबडतोब चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा उडान हेल्पलाईन 9011026495 वर कळवावे नावाची कुठून ठेवले जाईल त्यामुळे नीसंकोच पणे बालीवर रोखण्यासाठी पुढाकार घ्या असे त्या म्हणाल्या.
*संविधान दिनानिमित्त विद्यार्थिनींचे पथनाट्य:*
शाळेतील विद्यार्थिनींनी संविधान दिन निमित्त पथनाट्य सादर केले, ज्यामध्ये संविधानाचे महत्व, त्यात दिलेले हक्क, कर्तव्ये आणि त्यांचे संरक्षण प्रभावीपणे मांडले. यावेळी सर्व उपस्थित पालक, शिक्षक आणि कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. योगिता प्रदीप पाडळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. हजारे विष्टल सखाराम यांनी केले. विद्यार्थ्यांना उडान प्रकल्पाची बालविवाह विरोधी प्रतिज्ञा दिली श्री. बोरुडे सिताराम सहावू यांनी. कार्यक्रमाच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी पर्यवेक्षिका श्रीमती वर्षा निवृत्ती भोईटे यांचे मोलाचे योगदान आहे.
*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन:*
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उडान टीमचे मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर आणि संचालक हनिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम, सोशल वर्कर शाहिद शेख, सीमा जुनी, आणि शुभांगी गुजर यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे कार्यक्रम प्रत्येकासाठी एक यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाची व्यापकता:
या कार्यक्रमामुळे स्नेहालय उडान प्रकल्प व श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून 1100 हून अधिक कुटुंबांमध्ये बालविवाहविरोधी जनजागृती करण्यात यश आले. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेने बालविवाह मुक्त शाळा होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.
समाप्ती:
स्नेहालय उडान प्रकल्प आणि श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय यांच्या कार्यामुळे बालविवाह मुक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
—
आपला नम्र,
प्रविण कदम
प्रकल्प व्यवस्थापक, उडान प्रकल्प
9011026495