अहिल्यानगर प्रतिनिधी:-अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकली चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला तोफखाना पोलिसांनी तीन महागड्या मोटरसायकलीसह ताब्यात घेत अटक केली.
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये होणाऱ्या मोटरसायकल चोरी गुन्ह्याचा तपास करत असताना तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सराईत मोटार सायकल चोर मनोज गोरख मांजरे याने गेल्या एक महिन्यापुर्वी अहिल्यानगर शहरातील तपोवन व सावेडी परिसरातुन मोटार सायकल चोरी केल्या आहेत.
या माहितीच्या आधारे तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपी मनोज मांजरे याला ताब्यात घेत त्याच्याकडे चोरी गेलेल्या मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने मागील एक महिन्यापुर्वी सावेडी, तपोवन या परिसरातुन बुलेट व इतर मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवून सदरच्या मोटार सायकली राहत असलेल्या घराच्या आडोशाला लपवून ठेवल्या आहेत असे सांगितल्याने त्याच्या राहत्या घरी जावुन त्याच्याकडुन तीन लाख 90 हजार रुपये किमतीच्या तीन महागड्या मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या.
हि कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाठ, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज बावळे, गणेश थोत्रे,वसिम पठाण, सुमित गवळी, शिरीष तरटे, सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतिष भवर,संदिप गि-हे,राहुल म्हस्के यांनी केली.