स्थानिक गुन्हे शाखेचा कत्तलखान्यावर छापा २६ जनावरांची केली सुटका तर १३ जणांवर केले गुन्हे दाखल 

स्थानिक गुन्हे शाखेचा कत्तलखान्यावर छापा २६ जनावरांची केली सुटका तर १३ जणांवर केले गुन्हे दाखल

 

 

 

 

अहील्यानगर प्रतिनिधी:-लोणी येथील ममदापुरच्या कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत

छाप्यात डांबुन ठेवलेले २६ जिवंत गोवंशी जनावरे ताब्यात घेऊन १३ इसमांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या अवैध गोमांस विक्री व्यावसायिकां विरूध्द कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/ राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,बापुसाहेब फोलाणे,विश्वास बेरड, संदीप पवार,गणेश लोंढे, संतोष लोढे,मनोहर गोसावी,गणेश भिंगारदे, पंकज व्यवहारे,अतुल लोटके,विजय ठोंबरे, सोमनाथ झांबरे,संदीप दरंदले,शिवाजी ढाकणे, जालींदर माने,सागर ससाणे,आकाश काळे, बाळसाहेब गुंजाळ, रणजीत जाधव,प्रमोद जाधव,रमीजराजा आत्तार,भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे व महादेव भांड अशांचे पथक तयार करुन कारवाई करणेकामी आदेशीत केले होते.पोनि/श्री दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ममदापुर,लोणी गावामध्ये फहीम नईम कुरेशी,फैजान जब्बार कुरेशी व इतर काही इसम गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवलेले आहेत,अशी माहिती मिळाली. मिळालेली माहिती पथकास देऊन, पडताळणी करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.तपास पथकाने दिलेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री करता घटना ठिकाणी वेगवेगळया राहते घराच्या आडोश्याला गोवंश जातीची जिवंत जनावरे निर्दयतेने बांधुन ठेवलेली मिळून आली.जनावरे कोणाच्या मालकीची आहे याबाबत विचारपूस केली असता नमूद जनावरे ही फहीम नईम कुरेशी,फैजान जब्बार कुरेशी,अक्रम लतीफ कुरेशी,मोहमंद नूर कुरेशी,जक्कु शब्बीर कुरेशी,अरबाज अब्दुल हक कुरेशी,नाजीम आयुब कुरेशी,आदिल सादिक कुरेशी,अब्दुल करीम कुरेशी,मुनिर अमीर कुरेशी,शाहिद युनुस कुरेशी,साजिद युनुस कुरेशी,रेहान महंमद अयास कुरेशी, (सर्व रा.ममदापुर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर) यांची असल्याची खात्री झाली.वर नमूद आरोपींचा शोध घेण्यात आला परंतु ते मिळून आले नाहीत. या घटना ठिकाणावरून 5 लाख 40,000/-रू किंमतीच्या 7 गायी, 4 कालवडी व 15 गोऱ्हे असे एकुण 26 जिवंत गोवंशी जनावरे मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आले.वर नमूद 13 आरोपी विरूध्द लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 687/2024 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ)(ब) (क) 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कुलबर्मे अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *