भक्तिमय वातावरणात आ.संग्राम जगताप यांच्या प्रचाराची सांगता
बाल वारकऱ्यांसमवेत ठेका धरत रिंगणात रंगले आ.जगताप
प्रभाग १ मध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थितीत प्रचाराची सांगता
नगर – महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी सकाळी ऐतिहासिक हस्त बेहस्त महाल ते भिस्तबाग चौकापर्यंत प्रचार फेरी काढून करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी उभे राहून आ.जगताप यांच्या प्रचार फरीचे स्वागत केले. फेरीच्या अग्रभागी बाल वारकरी टाळ मृदंग वाजवत विठू नामाचा जयघोष करत सहभागी झाले होते. यावेळी आमदार जगतापही उभ्या रिंगणात टाळ व मृदंग वाजवत बाल वारकऱ्यांसमवेत ठेका धरत बरोबर काही वेळ ज्ञानोबा तुकारामाचा जयघोषात रंगले. यावेळी धनगर समाजाच्या वतीने नागरिकांनी काठी घोंगडी देऊन तसेच भंडाऱ्याने मळवट भरून आमदार जगताप यांचा सत्कार केला. ठिकठिकाणी त्यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात येत होती. तसेच बांधून फेटे बांधलेल्या अडीचशे महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या या भव्य स्वागताने आ.जगताप भारावले होते.
यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक संपत बारस्कर, माजी नगरसेविका मीना चव्हाण, दिपाली बारस्कर, डॉ.सागर बोरुडे, उपनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, किरण बारस्कर, प्रशांत निमसे, सुनील डोंगरे, अंकुश बोरुडे, सचिन बारस्कर, नितीन बारस्कर, शरद बोरुडे, प्रशांत भालेराव, सतीश ढवन, विलास ढवन, स्वप्नील ढवन, हभप खोसे महाराज आदींसह मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते.
संपत बारस्कर म्हणाले, या निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी पहिल्या दिवसापासूनच आघाडी घेतली आहे. आ.जगतापांच्या सहकार्याने प्रभाग एक मध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या विकास कामांमुळे नागरिकांचे प्रश्न मार्गी लागली आहेत. शहरातील सर्व भागांमध्ये केलेल्या विकास कामांमुळे आमदार संग्राम जगताप यांचा विजय निश्चित असून आजपर्यंतच्या सर्व निवडणुकांचे रेकॉर्ड मोडीत काढून एवढ्या मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील.
मीना चव्हाण म्हणाल्या, कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत करण्यासाठी प्रभाग एक मधील महिला भगिनी मोठ्या उत्साहात उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरल्या आहेत. नगर शहराला नवस्वरूप प्राप्त होण्यासाठी आमदार जगतापच विजय होऊन ते मंत्री होणे आवश्यक आहेत.
———————————
मा.संपादक
कृपया प्रसिद्धीसाठी
आपला विश्वासू
सिद्धार्थ दीक्षित
फोटो –
महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचाराची सांगता ऐतिहासिक हस्त बेहस्त महाल ते भिस्तबाग चौकापर्यंत प्रचार फेरी काढून करण्यात आली. यावेळी आ.जगताप यानी बाल वारकऱ्यांसमवेत ठेका धरला.