अहिल्यानगर प्रतिनिधी:-विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.कोपरगाव शहरातून अवैध दारू वाहतूक करणारे दोघे रिक्षासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
त्यांच्या कडून एकूण ३ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशाल रमेश पाटील, (वय २३, रा.निघोज निमगाव, ता.राहाता, जि.अहिल्यानगर), गौतम वाल्मिक जगताप, (वय २०, रा.निघोज निमगाव, ता.राहाता, जि.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार विशाल पाटील व त्याचा साथीदार दोघे ॲपे रिक्षातून अवैध दारू विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे,रणजीत जाधव, विशाल तनपुरे व रमीज राजा आत्तार यांच्या पथकाने केली.