दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद

 

 

प्रतिनिधी:प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 21/12/2025 रोजी रात्री पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांना पाच इसम हे विनानंबरचे दोन मोटार सायकलवर सुपा ते पारनेर जाणारे रोडने दरोडा टाकण्याचे उद्देशाने जाणार आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाली.

नमुद बातमी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/ संमीर अभंग, पोलीस अंमलदार अतुल लोटके, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, आकाश काळे, सागर ससाणे, बाळासाहेब खेडकर, यांना समजावुन सांगुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.

त्यानंतर पथक तात्काळ सुपा ते पारनेर जाणारे रोडवर सापळा लावुन थांबले असता, नमुद ठिकाणी दोन मोटार सायकल समोरुन येतांना दिसुन आले. पथकाने सदर मोटार सायकल थांबुन त्यांना पोलीसांची ओळख सांगत असतांना एक मोटार सायकलस्वर तेथुन पळुन गेला. पथकातील अंमलदार यांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आला नाही. ताब्यात घेतलेल्या चार इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे 1) सगड्या उंब-या काळे, वय – 50 वर्षे, रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर 2) मिथुन उंब-या काळे, वय- 26 वर्षे रा. सदर, 3) सार्थक सगड्या काळे, वय – 23 वर्षे रा. सदर, 4) गणमाळ्या संजय चव्हाण, वय – 23 वर्षे, रा. दिवटे मळा, वाघुंगे, ता. पारनेर जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर मिथुन काळे यास पळुन गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्याने पळुन गेलेल्या इसमाचे नाव 5) अजय सादिश काळे रा. वाळुंज पारगाव, ता. जि. अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या इसमांचे पथकाने पंचासमक्ष संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे कब्जात 500/-रु.कि.चा 1 लोखंडी कटावणी, 200/- रु.कि.चा 1 लोखंडी ऍ़डजस्टेबल पान्हा, 200/-रु.कि.चा. 2 गलोल, 50,000/-रु कि.ची एक मोटार सायकल, असा एकुण 50,900/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी नामे सगड्या उंब-या काळे याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सदराखाली एकुण खालीलप्रमाणे 13 गुन्हे दाखल आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम

1 बेलवंडी, जि. अहिल्यानगर 181/2014 भा.दं.वि.क. 399

2 श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर 24/2011 भा.दं.वि.क. 395

3 घारगांव, जि. अहिल्यानगर 25/2020 भा.दं.वि.क. 380,457

4 पारनेर, जि. अहिल्यानगर 261/2015 भा.द.वि. क.379,34

5 सुपा, जि. अहिल्यानगर 281/2019 भा.द.वि.क.302

6 पारनेर, जि. अहिल्यानगर 413/2024 भा.द.वि. क.394,395,397

7 संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर 520/2023 भा.द.वि. क. 380,511

8 पारनेर जि. अहिल्यानगर 66/2016 भा.द.वि.क. 457,380

9 श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर 81/2014 भा.द.वि. क.399

10 बेलवंडी जि. अहिल्यानगर 98/2018 भा.द.वि. क. 399,402

11 बेलवंडी, जि. अहिल्यानगर 121/2012 भा.द.वि.क.395

12 पारनेर, जि. अहिल्यानगर 147/2024 भा.द.वि. क.392

13 पारनेर, जि. अहिल्यानगर 159/2016 भा.द.वि. क.380,457

 

आरोपी नामे मिथुन उंब-या काळे,याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर व पुणे ग्रामिण जिल्ह्यामध्ये सदराखाली एकुण खालीलप्रमाणे 07 गुन्हे दाखल आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम

1 घारगांव, जि. अहिल्यानगर 24/2021 भा.दं.वि.क. 302

2 सुपा, जि. अहिल्यानगर 281/2019 भा.द.वि.क.302

3 आळेफाटा, जि.पुणे ग्रामिण 291/2022 भा.द.वि.क.395,397

4 पारनेर, जि. अहिल्यानगर 413/2024 भा.द.वि. क. 394,395,397

5 पारनेर, जि. अहिल्यानगर 687/2023 भा.द.वि. क. 307,380,451

6 बेलवंडी, जि. अहिल्यानगर 172/2018 भा.दं.वि.क. 323,324,504,506

7 बेलवंडी, जि. अहिल्यानगर 174/2018 भा.दं.वि.क. 399,402

 

आरोपी नामे सार्थक सगड्या काळे, याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सदराखाली एकुण खालीलप्रमाणे 06 गुन्हे दाखल आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम

1 नगर तालुका जि. अहिल्यानगर 07/2022 भा.दं.वि.क. 394,34

2 सुपा, जि. अहिल्यानगर 11/2024 भा.दं.वि.क. 457,380

3 नगर तालुका, जि. अहिल्यानगर 14/2024 भा.दं.वि.क. 394,34

4 नगर तालुका, जि. अहिल्यानगर 305/2022 भा.द.वि. क.392,34

5 नगर तालुका, जि. अहिल्यानगर 563/2021 भा.द.वि.क.394,34

6 पारनेर, जि. अहिल्यानगर 886/2023 भा.द.वि. क. 380,458,459

 

वर नमूद आरोपी यांचेविरुध्द विरूध्द सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. 443/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4), 310 (5), प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *