राष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेमध्ये छत्रपती अकॅडमीला १ सुवर्ण व २ रौप्य पदके
प्रतिनिधी:दिनांक. 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर रोजी इंडियन मिक्स बॉक्सिंग फेडरेशन व हौशी मिक्स बॉक्सिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली “६ वी राष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५” रायगड जिल्ह्यातील धाटव येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या चॅम्पियनशिपमध्ये देशातील बारा राज्यातील सुमारे ५०० खेळाडूंनी भाग घेतला होता. ज्यामध्ये केरळ राज्याने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री तथा मिक्स बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षा ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेमध्ये आपल्या छत्रपती अकॅडमीच्या ३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांना यश आले असून मेडल्स प्राप्त झाले आहेत. ते मेडल्स पुढील प्रमाणे….
१)अविष्कार गुंजाळ -सुवर्णपदक
२) ओम वाघ – रौप्यपदक
३) सोहम कराळे – रौप्य पदक.
या सर्वांचे छत्रपती अकॅडमी चे नारायण कराळे सर, फेडरेशनचे संस्थापक महासचिव श्री. राकेश म्हसकर , महाराष्ट्र मिक्स बॉक्सिंग चे कार्याध्यक्ष प्रशांत मोहिते, आयोजन समितीचे अध्यक्ष गणेश पेरे, इंडियन मिक्स बॉक्सिंग फेडरेशनच्या वंदना पिंपळकर, अश्विनी खराडे, विनायक सपकाळ व अहिल्यानगर जिल्हा मिक्स बॉक्सिंग असोसिएशन पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
