अहिल्यानगर: दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर-महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा (मुले) जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत एकूण 27 संघांनी सहभाग नोंदवला.या स्पर्धेत विश्वभारती अकॅडमीचे कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट, अहिल्यानगर
येथील एम.बी.ए. विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 🎉
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय खेळ कौशल्य, संघभावना आणि शिस्तीचे उत्तम प्रदर्शन करत कॉलेजचे नाव उज्ज्वल केले. स्पर्धेत सहभागी सर्व संघांमध्ये तीव्र स्पर्धा असूनही, या संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.
विशेष म्हणजे, या विजयी संघातील ओमकार पर्वते व प्रथमेश व्यवहारे यांची पुढील झोनल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली असून, हा क्षण संपूर्ण कॉलेजसाठी अभिमानाचा ठरला आहे. 💪✨
नगर शहराचे आमदार माननीय श्री. संग्राम भैय्या जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे सर, क्रीडा अधिकारी गर्जे सर, अहिल्यानगर विभागीय क्रीडा समिती सचिव डॉ. राजेंद्र देवकाते सर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुनील जाधव सर, क्रीडा समिती सदस्य प्रा.संजय धोपावकर सर ,डॉ.विजय म्हस्के सर, विश्वभारती अकॅडमीचे कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य गणेश जानवळे सर , कॅम्पस डायरेक्टर नवले मॅडम, प्रशासकीय अधिकारी आदरणीय गोडगे सर ,कॅम्पस डीन साखरवाडे मॅडम , अकॅडमीक डीन चौधरी सर, तसेच क्रीडा विभागाचे रवींद्र भागवत सर व शारीरिक शिक्षण संचालक कराळे नारायण सर या सर्वानी संघाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…..
अभिनंदन करताना कॅम्पस डायरेक्टर नवले मॅडम ने सांगितले की,
“आमच्या विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही प्राविण्य मिळवून कॉलेजचा गौरव वाढविला आहे. त्यांची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”*
कॉलेज प्रशासन, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी वर्गातून विजयी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून आगामी झोनल स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. 🌟🎊💐
