वडाळी ता. श्रीगोंदा तालुक्यामध्ये रस्ता लुट करणारी टोळी 11,10,000/- रुपये किमतीचे मुद्देमालास जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई
प्रतिनिधी :प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी कार्तिक सचिन मिसाळ वय – 20 वर्षे, खेडकर मळा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर हे दिनांक 08/10/2025 रोजी रात्री 09.00 वा. चे सुमारास वडाळी रोडला लोखंडे मळ्याचे टेकडीवर श्रीगोंदा येथे जात असतांना त्यांना गाडीला एक पांढ-या रंगाची स्विप्ट गाडी आडवी लावुन त्यांना गुप्तीचा धाक दाखवुन त्यांचेकडील 2,80,000/- रु किमतीचे 37.5 ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन मोबाईल बळजबरीने चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. 889/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (6), 126(2), 115(2) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता.
मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, फुरकान शेख, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करुन पथकास गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनाठिकाणी भेट देवुन फिर्यादीकडुन आरोपींचे वर्णन प्राप्त करुन तसेच घटनाठिकाणचे आजुबाजुचे रोडचे सी. सी. टी. व्ही. फुटेज चेक करुन आरोपीबाबत माहिती संकलित केली. दिनांक 13/10/2025 रोजी सदर आरोपीचे वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचा गुन्हा हा प्रथमेश शिंदे व त्याचे साथीदार यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर आरोपींची माहिती काढत असतांना पथकास सदर आरोपी हे त्यांचेकडील गुन्ह्यात वापरलेल्या कारने पारगांव फाटा श्रीगोंदा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर माहिती आधारे पारगांव फाटा सापळा रचुन थांबले असता बातमीतील दोन कार पारगांव फाट्याकडे येतांना दिसले. पोलीस पथकाने सदरची कार अडवुन कारमधील इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) अनिकेत गोरख उकांडे वय-26 वर्षे रा. अकोळनेर ता. जि. अहिल्यानगर, 2) प्रथमेश शिवनाथ शिंदे वय- 22 वर्षे रा. शिवाजी चौक, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा, 3) विजय शहाजी देशमुख वय-30 वर्षे रा. नळवणे ता. जुन्नर, जि. पुणे असे असल्याचे सांगितले त्यांचेकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपुस करता प्रथमेश शिवनाथ शिंदे याने सांगितले की, सदरचा गुन्हा हा माझी मैत्रिण 4) मयुरी आनंदा पाटील ता. नातोशी ता.पाटण जि.सातारा 5) बंडु उर्फ सागर भिमराव साळवे रा.बाबुर्डी बेंद ता.जि. अहिल्यानगर 6) प्रतीक धावडे पुर्ण नांव माहिती नाही रा. तांदळी दु ता. श्रीगोंदा अशांनी मिळुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
आरोपींचे ताब्यातुन गुन्ह्यातील मोबाईल फोन, गुन्ह्याचे वेळी वापरलेली दोन कार असा एकुण 11,10,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरील आरोपी रेकॉर्डवरील असुन त्यांचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यामध्ये रेल्वे ऍ़क्ट, विनयभंग, गंभीर दुखापत करणे या सारखे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. आरोपीचे नांव पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 अनिकेत गोरख उकांडे वय-25 वर्षे रा. अकोळनेर ता.जि. अहिल्यानगर दौड रेल्वे पो.स्टे जि.पुणे 08/2023 रेल्वे ऍ़क्ट क.3,4, 147
2 विजय शहाजी देशमुख वय-30 वर्षे रा. नळवणे ता.जुन्नर जि.पुणे दौड पो.स्टे जि.पुणे 114/2024 भा.द.वि. क. 354
3 बंडु उर्फ सागर भिमराव साळवे अहिल्यानगर तालुका पो.स्टे जि.अहिल्यानगर 214/2014 भा.द.वि. क. 326, 323, 504, 506, 34
ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
