अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदीरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

 

 

 

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदीरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मंदीर चोरीचे एकुण 15 गुन्हे उघडकीस आणुन 4,83,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची मोठी कारवाई

——————————————————————————————————————————

अहिल्यानगर प्रतिनिधी :प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 04/10/2025 रोजी ते 05/10/2025 रोजीचे दरम्यान रोजी रात्री श्री. शनिमारुती मंदीर, करोडी ता. पाथर्डी या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदीरातील दानपेटीतील एकुण 3,50,000/- रुपये रोख रक्कम चोरुन नेले आहे. याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गु. र. नं. 1138/2025 बी.एन.एस. 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

 

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंदीरातील दानपेटी, देवी, देवतांचे दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती. मंदीरामध्ये झालेल्या चोरीच्या घटनांमुळे भाविक व ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण तयार झालेले होते. मा. श्री. सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदीरामध्ये झालेल्या घरफोडी चोरीच्या घटनांचा आढावा घेवुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत.

नमुद आदेशान्वये किरणकुमार कबाडी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी मंदीर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार सुरेश माळी, गणेश लोंढे, विष्णु भागवत, फुरकान शेख, राहुल डोके, आकाश काळे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, प्रशांत राठोड, महादेव भांड महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंदीर चोरीचे घटनांची माहिती घेवुन अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपींची माहिती संकलित करुन गुन्हे उघडकीस आणणेकरीता पथकास मार्गदर्शन व सुचना देवुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.

वर नमुद पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदीर चोरीचे गुन्ह्यांचा आढावा घेवुन प्रत्येक गुन्हा ठिकाणी भेटी देवुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती संकलित केली. सदर माहितीचे आधारे गुन्हृयातील आरोपींची माहिती काढत असतांना दिनांक 10/10/2025 रोजी गोपनिय माहितीनुसार सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे राहुल किशोर भालेराव रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीनुसार 1) राहुल किशोर भालेराव रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, 2) रामेश्वर ज्ञानदेव धनेश्वर रा. इंदिरानगर, भोकर ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, 3) एकनाथ नारायण माळी रा. ममदापुर ता. राहाता हल्ली रा. बिरोबा बन, शेतकरी हॉटेल मागे, शिर्डी, 4) शत्रुघ्न मुरलीधर मोरे रा. टाकळी मानुर, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर हे वेगवेगळ्या ठिकाणी मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार 5) राहुल भाऊसाहेब माळी रा. बिरोबा बन, शेतकरी हॉटेल मागे, काच मंदीर रोड, भिल वस्ती, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर (फरार), 6) पांडु उर्फ दत्तु बाबासाहेब मोरे, रा. भोकर, ता. श्रीरामपुर (फरार) 7) पांडु उर्फ दत्तु बाबासाहेब मोरे याचा एक अनोळखी मित्र त्याचे नाव गाव माहिती नाही अशांनी मिळुन मागील 7 ते 8 महिण्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंदीरामध्ये घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

ताब्यातील आरोपींचे कब्जातुन 4,83,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे – चांदीचे दागिने, गुन्ह्याचे वेळीवापरलेल्या दोन मोटारसायकल, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपींकडुन अहिल्यानगर व कोल्हापुर जिल्ह्यातील खालीलप्रमाणे 15 मंदीर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम

1 पाथर्डी, जि. अहिल्यानगर 1138/2025 बी.एन.एस. कलम 303 (2)

2 पाथर्डी, जि. अहिल्यानगर 1152/2025 बी.एन.एस. कलम 303 (2)

3 पाथर्डी, जि. अहिल्यानगर 1151/2025 बी.एन.एस. कलम 303(2)

4 पाथर्डी, जि. अहिल्यानगर 534/2025 बी.एन.एस. कलम 303(2)

5 पाथर्डी, जि. अहिल्यानगर 115/2025 बी.एन.एस. कलम 334(1)

6 लोणी जि. अहिल्यानगर 536/2025 बी.एन.एस. कलम 305(ड), 331 (4)

7 लोणी जि. अहिल्यानगर 448/2025 बी.एन.एस. कलम 305(ड), 331

8 लोणी जि. अहिल्यानगर 542/2025 बी.एन.एस. कलम 305(ड), 331 (4)

9 लोणी जि. अहिल्यानगर 538/2025 बी.एन.एस. कलम 305(ड), 331(3)

10 घारगांव, जि. अहिल्यानगर 260/2025 बी.एन.एस. कलम 334(1)

11 राहाता, जि. अहिल्यानगर 278/2025 बी.एन.एस. कलम 305(ई), 331(4)

12 श्रीरामपुर तालुका, जि. अहिल्यानगर 361/2025 बी.एन.एस. कलम 334(1)

13 एम.आय.डी.सी., जि. अहिल्यानगर 585/2025 बी.एन.एस. कलम 334(5), 305

14 संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर 644/2025 बी.एन.एस. कलम 305

15 हातकणंगले, जि. कोल्हापुर 226/2025 बी.एन.एस. कलम 303 (2)

 

आरोपी नामे राहुल किशोर भालेराव रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर, छ. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दरोडा तयारी, जबरी चोरी, सरकारी कामात अडथळा आणणे, घरफोडी, चोरीचे खालीलप्रमाणे 19 गुन्हे दाखल आहेत.

 

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम

1 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 160/2018 भादवि क 461,34

2 राहुरी, जि. अहिल्यानगर 35/2019 भादविक 461,380

3 श्रीरामपुर शहर जि. अहिल्यानगर 13/2019 भादविक 353,332,504,506

4 श्रीरामपुर शहर जि. अहिल्यानगर 14/2019 भादविक 327,427

5 श्रीरामपुर शहर जि. अहिल्यानगर 210/2020 भादविक 399,402

6 श्रीरामपुर शहर जि. अहिल्यानगर 173/2020 भादविक 399,402

7 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 172/2023 भादविक 380,511

8 एम.आय.डी.सी. जि. अहिल्यानगर 250/2019 भादविक 392

9 राहुरी जि. अहिल्यानगर 235/2019 भादविक 399,402

10 राहुरी जि. अहिल्यानगर 1222/2023 भादविक 392,504,34

11 राहुरी जि. अहिल्यानगर 1232/2023 भादविक 380,511

12 राहुरी जि. अहिल्यानगर 1243/2023 भादविक 399,402

13 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 85/2023 भादविक 452,394,34

14 सोनई, जि. अहिल्यानगर 448/2023 भादविक 379,427,511

15 श्रीरामपुर तालुका, जि. अहिल्यानगर 561/2023 भादविक 461,380

16 संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर 156/2023 भादविक 379

17 अकोले, जि. अहिल्यानगर 599/2023 भादविक 454,380

18 कोपरगांव तालुका, जि. अहिल्यानगर 508/2023 भादविक 379

19 गंगापुर, जि. छ. संभाजीनगर 09/2022 भादविक 394,34

 

ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1138/2025 बी. एन. एस. 2023 चे कलम 303(2) वगैरे गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *