कत्तलीसाठी आणलेल्या 14 गोवंशीय जनावरांची सुटका व 800 किलो गोमांस जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
——————————————————————————————————————-
अहिल्यानगर प्रतिनिधी :मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/समीर अभंग, दिपक मेढे, पोलीस अंमलदार सुनिल पवार, संतो, खैरे, भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे. जालिंदर नामे, प्रमोद जाधव, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, चंद्रकांत कुसळकर, भगवान धुळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणाची व अवैध कत्तलखान्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
दिनांक 09/10/2025 रोजी वर नमुद पथक लोणी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास इसम नामे मुश्ताक कुरेश हा त्याचे इतर 4 जणांनी गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याचे उद्देशाने जिवंत जनावरे आणलेले असुन ते जनावरांचे कत्तल करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने ममदापुर या ठिकाणी जावुन खात्री करता काटवनामध्ये गोवंशीय जनावरे बांधलेले दिसली. तसेच सदर ठिकाणी एका स्विप्ट कारमध्ये काही इसम गोमांस भरतांना दिसुन आले. तेव्हा सदर ठिकाणी छापा टाकण्याकरीता जात असतांना त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते तेथुन पळुन गेले आहे. पळुन गेलेल्या इसमांबाबत तेथे असलेल्या लोकांकडे विचारपुस करता त्यांनी त्यांचे नांवे 1) मुश्ताक कुरेशी 2) आदिल कुरेशी 3) अब्दुल करिम कुरेशी 4) शाहिद युनुस कुरेशी 5) साजीद युनुस कुरेशी सर्व रा. ममदापुर ता.राहाता असे असल्याचे सांगितले आहे.
सदर ठिकाणीवरुन 5,10,000/- रुपये किमतीचे 14 गोवंशीय जिवंत जनावरे, व 5,00,000/- रुपये किमतीची स्विप्ट कार क्रमांक एम.एच. 02 ए. पी.2921 व 2,40,00/-रुपये किंमतीची 800 किलो गोमांस असा एकुण 12,50,00/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पळुन गेलेल्या आरोपीविरुध्द पोकॉ/2630 सुनिल रमेश मालणकर नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन लोणी पोलीस ठाणे गु.र.नं. 550/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271,325,3(5) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम क. 5,5(अ), 5(ब), 5(क),9 9(ब), प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
