कोतवाली पोलीसांनी बेकायदेशीररित्या 10 किलो गांजा विक्री करणा-या इसमांना मोठ्या शिताफिने केले जेरबंद, तीन लाख, सहा हजार, पाचशे पन्नास रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत.
नगर प्रतिनिधी: दि. 15/08/2024 रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री प्रताप दाराडे सो यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अशोका हॉटेल जवळील पाण्याचे टाकयाचे खाली ओसाड असलेल्या जागेत झेंडीगेट, अहमदनगर येथे काही इसम बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ विक्री करत आहेत आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांनी सपोनी योगीता कोकाटे, पोउप निरीक्षक महेश शिंदे, पोहेकॉ राजेंद्र औटी, पोहेकों /1212 इनामदार, पोना बापुसाहेब गोरे, मपोना संगीता बढे, पोकों दिपक रोहकले, पोकों तानाजी पवार, पोकों सुजय हिवाळे, पोका सुरज कदम, पोकों सचिन लोळगे, पोकों शिवाजी मोरे, पोकों अनुप झाडबुके अशा अधिकारी व अंमलदारांना सदर ठिकाणी जावुन तात्काळ कारवाई करणे बाबत आदेशीत केल्याने अधिकारी व अंमलदारांनी छाप्याचे नियोजन करुन सदर ठिकाणी छापा कसा घालावा याबाबत योग्य नियोजन करुन बातमीतील नमुद ठिकाणी छापा घालणे कामी सरकारी पंच व पोलीस स्टाप सहीत छाप्याकामी लागणारे सर्व साहीत्य घेवुन रवाना होवुन सदर ठिकाणी जावुन खात्री करुन सदर ठिकाणी ठिक-19.20 वा चे सुमा खात्री केली असता, पाण्याचे टाकीखाली दोन मोटार सायकल व त्याचे जवळ 4 इसम हे दोन सॅक बॅग घेवुन संशयित रित्या थांबलेले होते. सर्व पथकाने पंचासमक्ष छापा टाकुन जागीच सर्व संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) ओकांर भाऊसाहेब तोरडमल वय 19 वर्ष रा सुपा ता पारनेर जि अहमदनगर, 2) अनिकेत परसराम हजारे वय 23 वर्ष रा चिचोंडी पाटील ताजि अहमदनगर, 3) ओमान लियाकत सय्यद वय 19 वर्ष रा हिंगणगाव ता जि अहमदनगर 4) अक्षय उत्तम चौधरी वय 22 वर्ष रा दुधसागर सोसायटी, शनीमंदीराजवळ, केडगाव, ता जि अहमदनगर असे सांगितल्यानंतर त्यांची सरकारी पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांचे कब्जातुन एकुण-3,06,550/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यामध्ये 1) 1.01,350/- रु किंमतीचा उग्र वासाचा, आमली पदार्थ गांजा निळ्या रंगाच्या एकुण 5 पिशव्यांमध्ये
2) 40,000/- रु किंमतीची लाल काळया रंगाची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स टु व्हिलर
3) 40,000/- रु किंमतीची निळया काळया रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर टु व्हिलर
4) 1,25,000/- रु किंमतीचे 5 विविध कंपनयांचे मोबाईल हँडसेट 5) 200/- रु किंमतीच्या दोन पाठीवर अडकवण्याच्या सॅक
एकणु-3,06,550/- रुपये
किंमतीचा मुददेमालासह जागीच सरकारी पंचासमक्ष जप्ती पंचनामा करुन सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुध्द कोतवाली पोलीस स्टेशनला गु रजि नं 926/2024, एन डी पी एस कायदा कलम 8 (क), 20 (ब) (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे या करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो, मा अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री अमोल भारती सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे, महीला सपोनि योगीता कोकाटे, पो.उप-निरीक्षक महेश शिंदे, पोहेकॉ राजेंद्र औटी, पोहेकों /1212 इनामदार, पोहेकों/ संदीप पितळे. पोहेकों विशाल दळवी, पोना बापुसाहेब गोरे, मपोना संगीता बढे, पोकों दिपक रोहकले, पोकों तानाजी पवार, पोकों सुजय हिवाळे, पोकों सुरज कदम, पोका सत्यजीत शिंदे, पोकों सचिन लोळगे, पोकों शिवाजी मोरे, पोकों अनुप झाडबुके, पोकों राम हंडाळ, सर्व नेम. कोतवाली पोलीस स्टेशन यांनी केली आहे