नगर प्रतिनिधी: काल दि.१२/०८/२०२४ रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नगर मध्ये आयोजीत केलेल्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व जनसंवाद सभेत घुसुन खिसे कापू चोरट्यांची टोळी हातसफाई करणार असल्याची गोपनिय माहीती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांना मिळल्याने तात्काळ त्यांनी गुन्हे शोध पथकास सदर चोरटे पकडण्याबाबत वेगवेगळया पथक करुन रवाना केले. सदर खिसे कापु टोळी ही जामखेड व नगर शहरातील आसलेची गोपणीय बातमी समजली त्यानंतर दुपारी ही टोळी अहमदनगर मध्ये मारुती स्वीफ्ट डिझायर व दोन मोटारसायकल सह शहरात आले व रॅलीत सहभागी झालेवर ठिकठिकाणी लोकांच्या गर्दीत घुसुन हातसफाई करणा-या चोरटयांना मोठ्या शिताफीने कोतवाली गुन्हे शोध पथकाने रॅली व सभेतुन एकुण १४ खिसेकापु चोरट्यांना ताब्यात घेवुन पुढील चोरीच्या घडणाऱ्या घटना वाचविण्यात मोठे यश आले आहे पुढील कार्यवाही करीता एकुण अटक करण्यात आलेल्या मध्ये १) सचिन विष्णु खामकर वय ३८ वर्षे रा प्रेमदान हडको अहमदनगर, २) आण्णा बाळु पवार वय ५१ वर्षे रा मिलिंद नगर ता. जामखेड जि अहमदनगर, ३) शामराव रामा गायकवाड वय २२ रा मिलींद नगर ता जामखेड जि अहमदनगर ४) अर्जुन तुळशिराम जाधव वय २० वर्ष राहणार सुपा हाईडसजवळ सुपा ता. पारनेर, ५) मच्छींद्र दशरथ गायकवाड वय २६ रा मिलींद नगर ता जामखेड जि अहमदनगर ६) राहुल शरद पवार वय २० वर्ष, राहणार नान्नज जवळा ता. जामखेड जि. अहमदनगर ७) बबलु रोहीदास साठे वय २५ राहणार मिलींद नगर ता जामखेड जि अहमदनगर ८) शितल रावसाहेब काळे वय २४ राहणार मिलींद नगर ता जामखेड जि अहमदनगर ९) विकास रमेश गायकवाड वय २० वर्ष, राहणार मिलींद नगर ता जामखेड जि अहमदनगर १०) सागर बाळु रिटे वय २५ वर्ष राहणार कुंभार तळ गोरोबा पिक्चर टॉकेज समोर ता जामखेड जि अहमदनगर, ११) एक अल्पवयीन मुलगा असे सांगीतले तसेच त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी आम्हीच व सोबत १२) विजय अशोक माने वय २२ वर्ष, राहणार मिलींदनगर, शिक्षक कॉलनी, जामखेड, ता जामखेड, जि अहमदनगर, १३) अजिनाथ आण्णा गायकवाड वय ६० वर्ष राहणार मिलींद नगर, जामखेड, ता जामखेड जि अहमदनगर, १४) नागु आण्णा गायकवाड वय ५४ वर्ष राहाणार मिलींद नगर, जामखेड, ता जामखेड, जि अहमदनगर, असे असुन त्यांचे ताब्यातुन काही चोरीस गेलेली रोकड व एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार व दोन मोटार सायकल असे मिळून एकुण रक्कम ६,६७,०००/-रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करणेत आला असुन सदर आरोपी विरुध्द पोकों अमोल दिलीप गाढे यांनी फिर्याद दिली असुन त्या नुसार कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं ९२०/२०२४ बी एन एस कलम ११२ (२), ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोहेकों / विक्रम वाघमारे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो, मा अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे, मा उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री अमोल भारती सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे व गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ गणेश धोत्रे, विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके, योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, पो नां/सलीम शेख, अविनाश वाकचौरे, मपोना/संगिता बडे, पोकों अभय कदम, दिपक रोहोकले अमोल गाडे, अतुल काजळे, सतिष शिंदे, तानाजी पवार, सत्यजित शिंदे,अनुप झाडबुके, सचिन लोळगे व दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडु यांनी केली आहे.