क्रमांकपीआरओ/प्रेसनोट/182/2024 प्रेस नोट दिनांक
संगमनेर शहरामध्ये हवाल्याची बेहिशोबी 42,15,000/- रूपये रोख रक्कम हस्तगत
आचार संहितेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची, अहिल्यानगरची कारवा
नगर प्रतिनिधी:मा.श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्हयात बेहिशोबी मालमत्ता बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर हे जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणारे इसमांची माहिती घेत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संगमनेर शहरामध्ये सहदेव ज्वेलर्स येथे इसम नामे भावेश पटेल व आशीष सुभाष वर्मा हे त्यांचे साथीदारासह आपले उत्पन्नापेक्षा जास्त रोख रक्कम शासनाचा कर भरणे आवश्यक असताना बेकायदेशीरपणे मोठया स्वरूपात रक्कम बाळगून हवालामार्फत विल्हेवाट लावत आहेत.अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/ तुषार धाकराव व पोलीस अंमलदार अतुल लोटके, अमृत आढाव तसेच मनोज गोसावी व रमीजराजा आत्तार नेम.तपास पथक श्रीरामपूर अशांचे तपास पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आवश्यक सुचना दिल्या.
तपास पथकाने संगमनेर शहरात सहदेव ज्वेलर्सचे वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये, पार्श्वथान गल्ली, संगमनेर येथे जाऊन खात्री केली असता दोन इसम मिळून आले. त्यांचेकडे त्यांचे नाव गाव याबाबत विचारपूस करता त्यांनी इसम नामे 1) मुकेशकुमार रमेशभाई पटेल, वय 36, रा.पार्श्वनाथ गल्ली, जैन मंदिराजवळ, संगमनेर मुळ राहणार गोठवा, ता.विसनगर, जिल्हा म्हैसाणा, गुजरात 2) धवलकुमार जसवंतभाई पटेल, वय 32, रा. रा.पार्श्वनाथ गल्ली, जैन मंदिराजवळ, संगमनेर मुळ रा.ठलोटा, ता.विसनगर, जि.म्हैसाणा, गुजरात असे सांगीतले.
पंचासमक्ष त्यांचे कब्जात असलेल्या रोख रक्कमेबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची रक्कम हवाल्याची असल्याचे सांगून ती त्यांचे मालक नामे 3) भावेश रामाभाई पटेल, रा.पार्श्वनाथ गल्ली, संगमनेर व 4) आशीष सुभाष वर्मा, रा.अहिल्यानगर यांची असल्याचे सांगीतले.
तपास पथकाने अधिक चौकशी केली असता मुकेशकुमार रमेशभाई पटेल व धवलकुमार जसवंतभाई पटेल यांचेकडे असलेली रक्कम ही त्यांनी कोठूनतरी बेकायदेशीर मार्गाने जमवून शासनाचा कर चुकवून स्वत:चे फायदयाकरीता हवाल्यामार्फत विल्हेवाट लावण्याकरीता मिळून आल्याची खात्री झाल्याने पंचासमक्ष मुकेशकुमार रमेशभाई पटेल यांचे कब्जामधुन 40,26,000/- रूपये रोख रक्कम व धवलकुमार जसवंतभाई पटेल याचे कब्जामधुन 1,89,000/- रूपये रोख रक्कम अशी एकुण 42,15,000/- रूपये रोख रक्कम जप्त करून ताब्यात घेण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या 42,15,000/- रूपये रोख रक्कमेबाबत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. कुणाल सोनवणे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.