अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्या नगर जिल्ह्यातील जामखेड व राहाता तालुक्यामध्ये अवैध दारु विक्री करणाऱ्या 14 हॉटेलवर छापे टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.नमुद आदेशाप्रमाणे पोनि.श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार बबन मखरे,अतुल लोटके, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, विशाल तनपुरे,प्रमोद जाधव तसेच बापुसाहेब फोलाणे,रणजीत जाधव व रोहित मिसाळ, नेम.तपास पथक अशांचे दोन पथक तयार करून जामखेड व राहाता तालुक्यामधील विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले होते.
पथकातील पोलीस अंमलदार यांनी दि.21 ऑक्टोबर 2024 रोजी जामखेड,राहाता व लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना दारू विक्री करणारे हॉटेलवर छापे टाकुण कारवाई केली.या कारवाईमध्ये एकुण 14 गुन्हे दाखल करुन 14 आरोपींचे ताब्यातुन 65,040/-रुपये किंमतीची देशी विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई चालु राहणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सांगितले.सदर कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर,श्री. विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत उपविभाग व श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे