महिलेचा निघृणपणे खुन करणारा आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 16/09/2024 रोजी झापवाडी शिवारात मुळा कॅनॉललगत असलेल्या शेतामध्ये अज्ञात आरोपीने अनोळखी महिला वय अंदाजे 60 वर्षे हिचा गळा आवळून जिवे ठार मारले. सदर घटनेबाबत पोसई/सुरज पांडूरंग मेढे, नेम.सोनई पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पो.स्टे.गु.र.नं. 387/2024 बीएनएस कलम 103 (1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा ü यांना सदर ना उघड खुनाचे गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
सदरची घटना घडल्यानंतर पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी घटनाठिकाणी भेट देऊन, स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, संतोष खैरे, महादेव भांड अशांचे पथक नेमुन वर नमुद गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने घटना ठिकाणच्या परिसरात सोनई, घोडेगाव, शनि शिंगणापूर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन, जिल्हयातील मिसींग महिलेबाबत माहिती घेऊन, अनोळखी मयत महिलेचे फोटो सोशल मिडीया व गुप्त बातमीदारास प्रसारीत केले होते.यावरून तपास पथकाने मयत अनोळखी महिला नामे जिजाबाई भाऊसाहेब रूपनवर, वय 70, रा.एकेरीवाडी, पो.देलवडी, ता.दौंड, जि.पुणे ही असल्याचे निष्पन्न केले.
तपास पथकाने गुन्हयांच्या तपासामध्ये कोणताही पुरावा नसताना, मयत महिलेचे राहते ठिकाणीच्या आजु बाजूस राहणारे लोकांकडे विचारपुस केली असता, आरोपी व मयत महिलेने आरोपीचे मोटार सायकलचा खराब झालेला बल्ब काष्टी ता.श्रीगोंदा येथील गॅरेजमध्ये नवीन टाकलेला असल्याची माहिती मिळाली.यावरून तपास पथकाने काष्टी ता.श्रीगोंदा येथील सर्व मोटार गॅरेजमध्ये माहिती घेऊन अनोळखी मयत महिलेची ओळख पटविली.
पथकाने काष्टी ता.श्रीगोंदा येथील मोटार गॅरेज, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करत असताना दिनांक 14/10/2024 रोजी सदरचा गुन्हा हा आरोपी नामे महादेव आनंदा महारनवर, रा.एकेरीवाडी, पो.देलवडी, ता.दौंड, जि.पुणे याने सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने तात्काळ एकेरीवाडी, पो.देलवडी ता.दौंड येथे जावुन संशयीतांचा शोध घेत असतांना 1 इसम मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव
महादेव आनंदा महारनवर, वय 55, रा.एकेरीवाडी, पो.देलवडी, ता.दौंड, जि.पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता दिनांक 15/09/2024 रोजी 12.00 वा.सुमारास तो मयत महिला नामे जिजाबाई भाऊसाहेब रूपनवर हिचेसह मोटार सायकलवरून एकेरीवाडी येथून शनि शिंगणापूरकडे जात होते. झापवाडी शिवारात मुळा कॅनॉलजवळ मयत महिला हिने गाडी थांबवून आरोपीसह शेतामध्ये पुजा करीत असताना, मयत महिला ही आरोपीवर काहीतरी जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरून आरोपीने तिच्या गळयातील स्कार्पने गळा आवळून तिस जीवे ठार मारल्याचे सांगीतले.तसेच मयत महिलेच्या गळयातील व कानातील सोन्याचे दागीने काढुन नेलेले होते.गुन्हयाचे तपासामध्ये 56,000/- रूपये किंमतीचे 8 ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले आहे.
ताब्यातील आरोपीस सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं.387/2024 बीएनएस कलम 103 (1) या गुन्ह्याचे तपासकामी मुद्देमालासह सोनई पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.