आमदार संग्राम जगताप यांच्या नियोजनामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्याला दिशादर्शक ठरेल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

वाडिया पार्क येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे कै.बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी मैदानाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पाहणी

 

 

वाडिया पार्क मैदान विकास कामातून बदलणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

 

आमदार संग्राम जगताप यांच्या नियोजनामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्याला दिशादर्शक ठरेल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

 

नगर : वाडिया पार्क येथे दि. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे कै.बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी मैदानाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली यावेळी आयोजक आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, माजी उपमहापौर गणेश भोसले, मनपा आयुक्त यशवंत डांगे स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, माजी नगरसेवक प्रकाश भागनगरे, माजी नगरसेवक सुभाष लोंढे, पै.अनिल गुंजाळ, निखिल वारे, बाळासाहेब पवार, मनीष साठे, ज्ञानदेव पांडुळे,पै. संतोष भुजबळ, शिवाजी चव्हाण,अभिजीत खोसे, शिवाजी कराळे, गुड्डू खताळ, अतुल कावळे, दादासाहेब पांडुळे, देवा शेळके,संपत नलवडे, महेश लोंढे आदी उपस्थित होते

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, वाडिया पार्क मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले असून आ. संग्राम जगताप यांनी चांगले नियोजन केल्यामुळे ही स्पर्धा राज्याला दिशा दर्शक ठरेल आता वाडिया पार्क क्रीडा संकुलनामध्ये खेळाची आंतरराष्ट्रीय मैदान तयार होणार असून यासाठी राज्य शासनाने 51 कोटीच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे, यापैकी 15 कोटी रुपये वर्ग देखील झाले आहे, वाडिया पार्क मैदानाच्या विकास कामासाठी निधी कमी पडून दिला जाणार नसल्याचे यावेळी सांगितले

यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *