तपोवन हडकोतील रस्ते कॉंक्रिटीकरण, ड्रेनेज लाईन च्या मूलभूत सुविधा आमदार संग्राम जगताप यांच्या परिश्रमाने पूर्ण
विकासाच्या नेतृत्वाला नागरिकांचे धन्यवाद – संपत बारस्कर
नगर शहर झपाट्याने विस्तारल्याने अहमदनगर महानगरपालिका झाली मात्र अनेक नव्या वसाहती मध्ये रस्ते, ड्रेनेज लाईन, लाईट या सारख्या मूलभूत सुविधा ची नागरिक प्रतीक्षा करत होते तपोवन हडको ही देखील अशीच वसाहत असून मतदारसंघातील शेवटचे टोक आहे मात्र आमदार संग्राम जगताप व माझ्या पाठपुराव्याने अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण, ड्रेनेज लाईन, लाईट या सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या या परिश्रमाला तपोवन हडको मधील नागरिकांनी धन्यवाद देत दाद दिली या वस्तीतील नागरिकांच्या बोलण्यातून विकासावर विश्वास जुना आणि येत्या विधानसभेत आमदार संग्राम जगताप पुन्हा अशा आशियाच्या प्रतिक्रिया नागरिक देत होते. गेली अनेक वर्ष हा भाग विकासापासून वंचित होता या भागातील नागरिकांची चर्चा झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून कचरा डेपो हटविण्याचे काम केले त्याचबरोबर या भागाचा पाणी प्रश्न मार्गी लावला या वसाहती मध्ये सर्वसामान्य नागरिक राहत असून त्यांचे प्रश्न सोडवीत असतात सकाळ पासून ते मध्यरात्री झोपे पर्यंत जनतेच्या सुख दुःखा मध्ये सामील होण्याचे काम केले जात असून हाच जनतेला पर्याय आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले
तपोवन हडको भागातील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण व ड्रेनेज लाईन कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेविका दिपालीताई बारस्कर, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, माजी नगरसेविका मीनाताई चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, सतीश ढवन, विलास ढवन, किसन कजबे, हिरामण पोपरे, तुकाराम बोरुडे, संध्या मेढे, बाळासाहेब खकाळ, आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
[ चौकट ] तपोवन रोड ची ओळख आता विकसित उपनगर म्हणून झाले आहे पुढील २० वर्षाचे नियोजन केले असून दर्जेदार विकासाची कामे मार्गी लागत आहे शहरांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाल्या मुळेच पुणे – मुंबई मधील बांधकाम व्यवसायिक शहरात येऊन नवनवीन प्रोजेक्ट उभे करत आहेत काही लोक राजकारणासाठी खोठे आरोप करत आहेत त्यांच्याकडे मनोरंजन म्हणून पहावे लोकशाहीत कोणालाही उभे राहण्याचा अधिकार आहे मात्र ते तुमच्याकडे काल्पनिक स्टोरी तयार करून येतील तेव्हा त्यांना विचारा तुम्ही पाच वर्षे कुठे होता कोविडच्या महाभयंकर संकट काळामध्ये मी तुमच्या बरोबर उभा राहिलो कधीही प्रसिद्धी दिली नाही त्या काळात माझ्या हातून चांगले काम घडले असल्यामुळे मी समाधानी आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेविका दिपाली बारस्कर, मीनाताई चव्हाण, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर यांनी मनोगते व्यक्त केली