अहमदनगर (दि.२३ सप्टेंबर):-नेवासा व भिंगार कॅम्प परिसरात चैन स्नॅचिंग करणारा अट्टल सराईत आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.घटनेतील बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी सौ.जिजाबाई कारभारी बुळे (रा.मजले चिंचोली,ता.अहमदनगर) या दि.05/08/2024 रोजी त्यांच्या पतीसह मोटार सायकलवरुन (हंडी निमगाव,ता.नेवासा) येथे जात असताना अनोळखी इसमाने गाडी त्यांची गाडी थांबवून तुम्ही माझे आईच्या अंगावर का थुंकला? असे म्हणुन फिर्यादीचे गळयातील 40,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र ओढुन तोडून बळजबरीने चोरुन घेवुन गेला बाबत नेवासा पो.स्टे. येथे गु.र.नं. 808/2024 बीएनएस कलम 309 (4), 351 (2) प्रमाणे चैन स्नॅचिंग जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांना रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधा करीता पथक नेमुण जिल्ह्यात घडलेल्या चैन स्नॅचिंगचे घटनांचा समांतर तपास करुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे,अतुल लोटके,फुरकान शेख,संतोष खैरे,अमृत आढाव, सागर ससाणे व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
तपास पथकाने चैन स्नॅचिंगच्या गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असतांना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी पोपट लक्ष्मण नरोडे, (रा.मोमीन आखाडा, ता.राहुरी, जि.अहमदनगर) याने केला असून सध्या तो मोगरा हॉटेल जवळ, तपोवन रोड, अहमदनगर येथे आलेला आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन,आरोपीची खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथकाने लागलीच तपोवन रोड, अहमदनगर येथे जावुन, सापळा लावुन संशयीत इसमास ताब्यात घेऊन, पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव पोपट लक्ष्मण नरोडे, (रा.मोमीन आखाडा, ता.राहुरी, जि.अहमदनगर) असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमांकडे कौशल्याने विचारपुस करता त्याने नेवासा, भिंगार कॅम्प परिसरात चैन स्नॅचिंग करुन चोरी केलेले सोन्याचे दागीने शनी चौक,राहुरी येथील सोनारास विक्री केल्याची माहिती दिली.आरोपी नामे पोपट लक्ष्मण नरोडे रा.मोमीन आखाडा, ता.राहुरी, जि.अहमदनगर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर विविध पोलीस स्टेशनला जबरी चोरीचे 8 गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.