गावठी कट्टा बाळगणारा इसम जेरबंद

 

कोपरगाव शहरामध्ये गावठी कट्टा बाळगणारा इसम ताब्यात,

 

स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

—————————————————————————————————————

नगर प्रतिनिधी: मा.श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

 

नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संतोष लोढे, प्रशांत राठोड, संतोष खैरे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, प्रमोद जाधव, आकाश काळे व महादेव भांड अशांचे पथक तयार करून, जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत आवश्यक सुचना देवुन पथक रवाना केले.

 

वरील तपास पथक कोपरगाव शहरामध्ये अवैध हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती घेत असताना पोनि/दिनेश आहे यांना दिनांक 01/10/2024 रोजी गुप्तबातमीदाराकडून इसम नामे शरद गोटीराम फुलारे, रा.पोहेगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर हा हॉटेल जे डी बिर्याणी हाऊस, येवला नाका, कोपरगाव याठिकाणी त्याचे कब्जात विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी कट्टा विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन आलेला असल्याची बातमी मिळाली. पोनि/दिनेश आहेर यांनी बातमीची हकीगत तपास पथकास कळवून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.त्यानुसार पथकाने हॉटेल जे डी बिर्याणी हाऊस, येवला नाका, कोपरगाव याठिकाणी जाऊन सापळा लावुन आरोपी नामे शरद गोटीराम फुलारे, रा.पोहेगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेता आरोपीचे ताब्यातुन 30,000/- किंमतीचा 1 गावठी पिस्टल, 3,000/- किंमतीचे 3 जिवंत काडतुसे, 1,20,000/- रू.किंमतीची बजाज पल्सर मोटार सायकल व 15,000/- रू किंमतीचा मोबाईल असा एकुण 1,68,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडे बारकाईने चौकशी करता, आरोपीने कोपरगाव, संगमनेर व नाशिक शहरात गुन्हे केल्याची माहिती दिल्याने त्यावरून गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे 3 गुन्हे उघडकिस आले आहेत.

 

 

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. कोपरगाव शहर 374/2024 बीएनएस कलम 305(अ), 331 (3)

2. संगमनेर शहर 236/2024 भादंविक 392

3. पंचवटी पो.स्टे नाशिक शहर 543/2024 बीएनएस 2023 चे कलम 303 (2)

 

आरोपी नामे शरद गोटीराम फुलारे, रा.पोहेगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर याचेविरूध्द कोपरगाव शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 447/2024 आर्म ॲक्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

 

आरोपी नामे शरद गोटीराम फुलारे, रा.पोहेगाव, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द यापुर्वी शिर्डी व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दरोडा व जबरी चोरीचे 9 गुन्हे दाखल आहेत.

ü

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. शिरीष वमने साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *