पाथर्डी तालुक्यामध्ये रस्ता आडवून बचत गटाचे 1,53,480/- रूपये लुटणारी 3 आरोपीची टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई
नगर प्रतिनिधी:प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी रामेश्वर सुभाष जायभाये, रा.शेवगाव हे क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लिमीटेड, शेवगाव येथे बचत गटाचे कलेक्शनचे काम करतात. दिनांक 01/10/2024 रोजी फिर्यादी हे मोटार सायकलवरून पाथर्डी तालुक्यातील विविध गावातील बचत गटाचे कलेक्शन करून शेवगावकडे जात असताना गाडेवाडी फाटयाजवळ मोटार सायकलवरून 3 अज्ञात इसमांनी फिर्यादीस मारहाण करून 1,53,480 रूपये रोख रक्कम जबरीने चोरून नेली. याबाबत पाथर्डी पो.स्टे.गु.र.नं. 931/2024 बीएनएस कलम 309 (6), 3 (5) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना वर नमूद जबरी चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/ तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संतोष लोढे, अतुल लोटके, सुरेश माळी, फुरकान शेख, अमृत आढाव, आकाश काळे, जालींदर माने, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ व महादेव भांड अशांचे पथक नेमुण आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
तपास पथक गुन्हयातील आरोपीची माहिती घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा उध्दव तुकाराम पवार, रा.टाकळीमानमूर, ता.पाथर्डी याने त्याचे साथीदारासह केलेला असून सध्या ते फुंदेटाकळी, ता.पाथर्डी येथे थांबलेले आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन, आरोपीची खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. पथकाने कोरडगाव शिवारात, फुंदेटाकळी, ता.पाथर्डी येथे जावुन, 3 संशयीत इसमास ताब्यात घेऊन, पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) उध्दव तुकाराम पवार, वय 19, रा.गाडेवाडी, टाकळीमानूर, ता.पाथर्डी 2) विठठल तुकाराम पवार, वय 24, रा.गाडेवाडी, टाकळीमानूर, ता.पाथर्डी व 3) रविंद्र उर्फ बंडू मच्छिंद्र घोडके, वय 32, रा. रा.गाडेवाडी, टाकळीमानूर,ता.पाथर्डी असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीकडून 1,20,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात सॅमसंग कंपनीचा टॅब व गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री.सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.