महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे अखेर निलंबित

महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे अखेर निलंबित

 

 

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पदाचा दुरुपयोग करून गुन्हेगारी वर्तन केल्या प्रकरणी अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.याबाबत आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी (ता. २१) फेब्रुवारी रोजी आदेश काढले आहेत.तसेच चौकशी समितीने २७ मुद्यांवर आक्षेप नोंदविला आहे.१५ व्या वित्तआयोगाचा १६ लाख १५ हजार रुपयांचा निधी शासकीय खात्यात वर्ग न करता तो निधी स्वतःच्या फायद्यासाठी संगनमत करून स्वतःच्या खात्यात वर्ग करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात डॉ.अनिल बोरगे,विजयकुमार महादेव रणदिवे (कंत्राटी लेखा व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान,महापालिका) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत डॉ.सतीश बाबुराव राजूरकर (प्र.आरोग्य अधिकारी, महापालिका) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. १५ व्या वित्तआयोगा अंतर्गत येणारा निधी शासकीय बँक खात्यात वर्ग न करता तो निधी विजयकुमार रणदिवे याने स्वतःच्या बँक खात्यात वर्ग केला.तसेच डॉ.बोरगे यांनी याबाबत कुठलीही उपाययोजना केली नसल्याने त्यांनी संगनमताने हे पैसे वर्ग केले असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. तसेच विविध कामात पदाचा गैरवापर केला असल्याचे समितीच्या तपासणीत पुढे आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *