अहिल्यानगर शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर विनापरवाना विक्री करण्यासाठी घेवुन जाणा-या इसमाकडुन 10,85,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

 

अहिल्यानगर शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर विनापरवाना विक्री करण्यासाठी घेवुन जाणा-या इसमाकडुन 10,85,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

——————————————————————————————————————————————-

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 17/11/2025 रोजी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थागुशा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत, एक इसम विनापरवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरच्या टाक्या पिकअप गाडी क्रमांक एम.एच.42 बी.एफ. 7981 यामध्ये भरुन एम.आय.डी.सी. ते केडगांव बायपास जाणारे रोडने जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हरिष भोये, व पोलीस अंमलदार सुनिल पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख, अर्जुन बडे अशांचे पथक नेमुन बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

वर नमुद पथकाने तात्काळ कल्याण रोड चौफुला येथे सापळा रचुन थांबले असता एक पिकअप गाडी क्रमांक एम.एच.42 बी.एफ. 7981 गाडी रोडने येत असतांना दिसुन आली. पथकाने सदर वाहनास थांबवुन त्यावरी चालकास त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव उमेश बाळासाहेब चांदगुडे वय – 37 वर्षे रा.सुपा ता.बारामती, जि. पुणे असे असल्याचे सांगितले. सदर इसमास त्यांच्या कब्जात मिळुन आलेल्या घरगुती गॅस टाक्या व त्याचे परवान्याबाबत विचारपुस करता त्याने त्यांच्याकडे कोणत्याही परवाना नसल्याचे सांगुन सदर गॅस टाक्या वाहनामधुन आणुन स्वतःचे आर्थिक फायद्या करीता कब्जात बाळगुन विनापरवाना विक्री करण्याकरीता नेत असल्याचे सांगितले. पथकाने सदर ठिकाणावरुन 7,00,000/- रु. कि. चीे एक पिकअप गाडी, 3,85,000/- रुपये किमतीच्या एच. पी. गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या 110 भरलेल्या व रिकाम्या गॅस टाक्या असा एकुण 10,85,000/- रुपये किमतीची मुद्देमाल जप्त केला आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता, एच. पी. गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या स्वतःचे आर्थिक फायद्या करीता कब्जात बाळगुन विक्री करण्यासाठी आपल्या कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने त्याचेविरुध्द पोहेकॉ/492 सुनिल विनायक पवार नेम. स्थागुशा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पो. स्टे. गु. र. नं. 1081/2025 भारतीय न्याय संहिता कलम बी.एन.एस. 2023 चे कलम 287, 288, सह जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3, 7 सह एल पी जी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश 2000 चे कलम 3(2)(b) सह गॅस सिलेंडर अधिनियम 2016 चे कलम 43, 45, 46 सह स्फोटके अधिनियम 1884 चे कलम 9(b) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *