*६ऑगस्टपासुन मनसेचे एस. पी. कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन*
*खा. निलेश लंकेना महिन्याला ५ कोटींची ऑफर देणाऱ्याला अटक करा- मनसे नेते अविनाश पवार*
*५कोटी आले कुठन तेही जनतेला समजले पाहिजे-पवार*
*मनसेचे पोलिस प्रशासनाच्या बदनामी संदर्भात अधिक्षकांना उच्च स्तरीय सामितीकडून चौकशीची मागणी*
नगर प्रतिनिधी : नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत आंदोलन थांबविण्यासाठी ५कोटीची ऑफर दिली असल्याचे जाहीर सांगितले असल्याने व त्यांच्याकडे पुरावे असल्याचं सांगितलं जातं आहे त्यामुळे ऑफर करणार्यावर कडक कारवाई करुन गुन्हा दाखल करावा पोलिस प्रशासनावरिल आरोपांमुळे अहमदनगर सह महाराष्ट्र पोलीसांची बदनामी झाली आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकारी वर्गाचं मानसिक खच्चीकरण झाले असल्याचे मनसे नेते अविनाश पवार यांनी म्हटले आहे तसेच सर्व सामान्य जनते मध्ये पोलिस प्रशासनाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे खरा प्रकार काय याचा गांभीर्याने विचार करुन दोषींवर ८ दिवसांत कठोर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एस.पी.ऑफीस अहमदनगर येथे मंगळवार ०६/०८/२०२४ पासून आरोपींना अटक होई पर्यंत बेमुदत ठिंय्या आंदोलन करण्यात येईल असे जिल्हा पोलिस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे यावेळी सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले, पारनेर तालुका उपाध्यक्ष सतीश म्हस्के, सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुर्यवंशी उपस्थित होते.