छत्रपती अकॅडमी ला शिकई मार्शल आर्ट्स स्पर्धेमध्ये ५ सुवर्ण व १ रौप्य*

*छत्रपती अकॅडमी ला शिकई मार्शल आर्ट्स स्पर्धेमध्ये ५ सुवर्ण व १ रौप्य*

 

नगर प्रतिनिधी:बुधवार दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी शालेय शिकई मार्शल आर्ट स्पर्धा २०२४ यशवंत माध्यमिक विद्यालय, (फकीरवाडा) मुकुंदनगर, अहमदनगर येथे झाल्या.या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचानलाय , महाराष्ट्र राज्य,पुणे व महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर मार्फत आयोजित केल्या होत्या.

या स्पर्धेत आपल्या छत्रपती अकॅडमीचे १० खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील आपल्या छत्रपती अकॅडमी ला ४ सुवर्ण व १ रौप्य पदक मिळाले. १४ वर्ष वयोगटात अनुष्का हेमंत चौधर व लक्ष डाळवाले यांनी सुवर्णपदक पटकावले. १७ वर्षे वयोगटात रोहित अशोक काळे नी सुवर्णपदक तर अंजली शरद कदम नी रौप्य पदक पटकावले. तसेच ख वन प्रकारात धनश्री काळे ने सुवर्णपदक पटकावले. १९ वर्षे वयोगटात ओंकार राजू भंडारी यांने सुवर्णपदक पटकाविले.

या स्पर्धा चंद्रकांत राहींज सर, योगेश वागस्कर सर, सबिल सय्यद सर, रोहित गायकवाड, नारायण कराळे,क्रीडा अधिकारी फिलिप्स सर व इतर पंच यांनी पार पाडल्या.

या स्पर्धेत विजयी झालेल्या मुलांना संघटनेचे सचिव चंद्रकांत राहिंज सर, छत्रपती अकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक नारायण कराळे सर, गणेश भगत, अनिल दादासाहेब तोडकर, तेजस रासकर,विक्रम भगत, सुनील कराळे, न्यू आर्ट कॉलेजचे क्रीडा प्रशिक्षक नडे सर, रेसिडेन्सी हायस्कूलचे क्रीडा प्रशिक्षक संदेश भागवत सर, प्रेमराज सारडा कॉलेजचे प्रो. साठे सर, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे सर , जिल्हा क्रीडा अधिकारी दिघे साहेब, क्रीडा अधिकारी फिलिप्स सर , सकाळ पेपरचे अल्ताफ कडकाळे सर, लोकमत पेपर चे योगेश गुंड सर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.तसेच पुढे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *