सरपंच पुत्र ठेकेदाराकडून लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

सरपंच पुत्र ठेकेदाराकडून लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

 

 

 

 

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

 

 

*यशस्वी सापळा कारवाई*

▶️ *युनिट -*अहिल्यानगर.

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय- 39 वर्षे

▶️ **आरोपी (खाजगी इसम)* – मकरंद गोरखनाथ हिंगे, वय- 40 वर्ष,धंदा-शेती, रा.वाळुंज, ता.जिल्हा अहिल्यानगर

 

▶️ *लाचेची मागणी*

1,00,000/- रुपये तडजोडी अंती 45,000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करून पहिला हप्ता म्हणून 25,000/- रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

दिनांक -02/04/2025

▶️ **लाच स्विकारली*

25,000/ रुपये

दिनांक -02/04/2025

▶️ **हस्तगत रककम* –

25,000/-रुपये

 

▶️ *लाचेचे कारण*

तक्रारदार हे सहकारी संस्थेचे सभासद असून ठेकेदारीचा व्यवसाय करीत आहेत. त्यांना वाळुंज ग्रामपंचायतच्या हद्दीत पेव्हर ब्लॉक बसवण्याचे टेंडर बांधकाम विभागाकडून सहा महिन्यापूर्वी मंजूर झाले होते. सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना दहा लाखाचे बील शासनामार्फत मंजूर झाले होते. सदर कामाच्या पूर्णत्वाचा दाखला वाळुंज ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून तक्रारदार यांना हवा होता तो दाखला देण्याच्या मोबदल्यात सरपंच यांचा मुलगा मकरंद हिंगे यांनी सरपंचांची सही घेऊन देण्याकरीता सरपंच यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 1,00,000/- रुपये लाचेची मागणी केले बाबतची तक्रार दि.02/04/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.02/04/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी (खाजगी इसम) मकरंद गोरखनाथ हिंगे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे1,00,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 45,000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करून पहिला हप्ता म्हणून 25,000/- रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दि.02/04/2025 रोजी अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव रोड, अहिंसा चौक येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी मकरंद हिंगे यांनी तक्रारदार यांचे कडून 25,000/- रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध कोतवाली पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ **सापळा व तपास अधिकारी*

श्रीमती छाया देवरे,

पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.8788215086

▶️ **सापळा पर्यवेक्षण अधिकारी**

श्री. अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र.वि., अहिल्यानगर, मो. क्र .8329701344

▶️ *सापळा पथक*

पोलीस नाईक उमेश मोरे, महिला पोलीस हवालदार राधा खेमनर,पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, चापोहेकॉ. दशरथ लाड

▶️ **मार्गदर्शक* –

मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

मोबा.नं. 91 93719 57391

 

—————————

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर.

*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

==================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *