राहुरी तहसिल परिसरातुन डंपर चोरी करणारे 03 आरोपी 9,00,000/-रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई
——————————————————————————————————————
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 05/11/2025 रोजी दुपारी 01/30 वा च्या दरम्यान राहुरी तहसिल परिसरात उभी केलेली विनानंबरचा पांढ-या करड्या रंगाचा डंपर कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरुन नेले आहे. याबाबत फिर्यादी श्री प्रशांत सयाजी औटी, वय – 37 वर्ष रा. राहुरी ता. राहुरी, जि. अहिल्यानगर, यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 1186/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिले होते.
वर नमुद सुचनेनुसार पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दिपक घाटकर, फुरकान शेख, भिमराज खर्से, भगवान थोरात, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार, सुर्वणा गोडसे यांचे पथक तयार करुन आरोपीचे शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असतांना दिनांक 07/11/2025 रोजी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हा डंपर घेवुन डोंगरगण जाणारे रोडवर पिंपळगांव तलावाजवळ आले असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन त्याचा शोध घेतला असता त्या ठिकाणी एक डंपर उभा असुन त्याचे जवळ तीन इसम उभे असलेले दिसुन आले. तेव्हा पथकाचे खात्री होतात त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) भगवान गोवर्धन कल्हापुरे वय- 38 वर्षे रा. खडांबे खुर्द ता.राहुरी, 2) सोमनाथ नामदेव ठाणगे वय- 31 वर्षे रा. देहरे ता. अहिल्यानगर जि. अहिल्यानगर 3) अविनाश भिकन विधाते वय- 29 वर्षे रा. ताहाराबाद ता. राहुरी जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यांना सदर गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता आरोपी नामे सोमनाथ ठाणगे यांनी सांगितले की, डंपर मालक भगवान गोवर्धन कल्हापुरे यांचे सांगणेवरुन आम्ही राहुरी तहसिल परिसरातुन सदरचा डंपर चोरी केली असल्याचे सांगितले आहे. त्यांचे 9,00,000/- रुपये किमतीचा एक बिननंबरचा डंपर जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपीस राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1186/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी आरोपी व मुद्देमाल हजर करण्यात आले असुन, पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
