घरगुती गॅस सिलेंडरची व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये रिफीलिंग 

 

घरगुती गॅस सिलेंडरची व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये रिफीलिंग

अहिल्यानगर प्रतिनिधी :प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 29/10/2025 रोजी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थागुशा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत, इसम नामे प्रविण नारायण खडके रा. चिचोंडी पाटील ता. जि. अहिल्यानगर हा व त्याचे साथीदारासह त्याचे राहते घराचे आडोशाला घरगुती वापराकरीता असलेला गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठा करुन सदरच्या घरगुती गॅस टाक्याची तो व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये रिफीलिंग करुन घरगुती गॅस सिलेंडरची बेकायदा विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/अनंत सालुगडे, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश लबडे, ह्रदय घोडके, बिरप्पा करमल, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, मनोज साखरे, महादेव भांड, उमाकांत गावडे अशांचे पथक नेमुन बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

वर नमुद पथकाने तात्काळ इसम नामे प्रविण नारायण खडके रा. चिचोंडी पाटील ता. जि. अहिल्यानगर याचे घराजवळ जावुन खात्री करता सदर ठिकाणी गॅस टाक्या ठेवलेल्या ठिकाणी तीन इसम मिळुन आले. तसेच सदर ठिकाणी लाल रंगाच्या गॅस टाक्या, चार वाहने मिळुन आली. पथकाने सदर ठिकाणी असलेल्या इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) प्रविण नारायण खडके वय- 28 वर्षे रा. चिचोंडी पाटील ता. जि. अहिल्यानगर 2) वैभव आंबादास पवार वय- 47 वर्षे रा. सांडवा ता. जि. अहिल्यानगर 3) गणेश पद्माकर भोसले वय – 37 वर्षे, रा. काष्टी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमांना त्यांच्या कब्जात मिळुन आलेल्या घरगुती गॅस टाक्या व त्याचे परवान्याबाबत विचारपुस करता त्याने त्यांच्याकडे कोणत्याही परवाना नसल्याचे सांगुन सदर गॅस टाक्या वाहनामधुन आणुन स्वतःचे आर्थिक फायद्या करीता कब्जात बाळगुन त्यामधील गॅस घरगुती व व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये भरत असल्याचे सांगितले. पथकाने घटना ठिकाणचा पंचासमक्ष पंचनामा करुन सदर ठिकाणावरुन 25,10,000/-रु कि. चे चार वाहने, 8,31,700/- रुपये किमतीचे एच. पी. व भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या 264 भरलेल्या व रिकाम्या गॅस टाक्या, तसेच 10,000/-रुपये किमतीची एक गॅस टाक्या भरण्यासाठी वापरण्यात येणारे मशिन, 5000/-रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकुण 33,65,500/- रुपये किमतीची मुद्देमाल जप्त केला आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता, भारत व एच. पी. गॅस कंपनीच्या रिकाम्या व भरलेल्या गॅस टाक्या स्वतःचे आर्थिक फायद्या करीता कब्जात बाळगुन त्यामधील गॅस घरगुती, व्यवसायीक टाक्यामध्ये व वाहनांमध्ये भरतांना ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका होईल अशा धोकादायक पध्दतीने ठेवुन, आपले कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने वरील आरोपी विरुध्द अहिल्यानगर तालुका पो. स्टे. गु. र. नं. 968/2025 भारतीय न्याय संहिता कलम बी.एन.एस. 2023 चे कलम 287, 288, सह जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3, 7 सह एल पी जी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश 2000 चे कलम 3(2)(b) सह गॅस सिलेंडर अधिनियम 2016 चे कलम 43, 45, 46 सह स्फोटके अधिनियम 1884 चे कलम 9(b) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *