अहिल्यानगर: मागील एका गंभीर प्रकरणात आरोपी असलेला आकाश बबन दंडवते (रा.सावेडी) जामिनावर सुटल्यानंतर ही त्याच्या गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे त्याने त्याच्या तीन अनोळखी साथीदारांसह नागापूर एमआयडीसी येथील एक्साइड कंपनीत कच्चामाल उत्तरविण्यासाठी आलेल्या वाहनचालकास दमदाटी करून मारहाण करत खंडणी मागितल्याची घटना गुरुवारी (दि.७) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी आकाश बबन दंडवते व इतर अनोळखी तीन अशा चार जणां विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कंपनीचे मानव संसाधन विकास अधिकारी निरंजन नंदकुमार कुलकर्णी (रा. एकविरा चौक सावेडी) यांनी याबाबत फिर्यादी दिली आहे. या कंपनीने पुरवठादारांशी करार केलेला असून पुरवठादार त्यांच्या वाहनातून कच्चामाल पुरवतात बुधवारी पुरवठा दाराचा टेम्पो कच्चामाल घेऊन कंपनीच्या गेट क्रमांक तीन वर आला त्यावेळी गुंड प्रवृत्तीचा आकाश दंडवते व त्याच्या साथीदारांनी चालकास दमदाटी केली कच्चामाल खाली केल्यास वाहन जाळून टाकण्याची धमकी दिली. आकाश दंडवते हा मागील एका प्रकरणात जामिनावर बाहेर सुटल्यानंतर सहा महिने शहरातून हद्दपार होता तरीही त्याची गुन्हेगारी वृत्ती बदललेली नाही गुन्हेगारी कारवाया करणे गोरगरिबाला त्रास देणे अवैधरित्या जागांवर ताबा मारणे चालूच आहे.अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाहीये तरी आपल्या अहिल्यानगरचे धडाडीचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घार्गे यांनी अशा प्रवृत्तीविरुद्ध कठोर पावले उचलावी अशी मागणी कर्मचारी व उद्योजकांकडन होत आहे.
