स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचारा विरोधात खा. नीलेश लंके यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू

 

 

नगर (प्रतिनिधी):-नगर जिल्हा पोलीस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचारा विरोधात खा.नीलेश लंके यांनी सोमवारपासून पोलीस अधिक्षक कार्यालयापुढे सुरू केलेल्या उपोषणादरम्यान सामान्य नागरिकांडून पोलिसांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचा अक्षरशःधो धो पाऊस पडला.दरम्यान, दिनेश आहेर यांची बदली तसेच अवैध व्यवसाय बंंद झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका खा. लंके यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.तक्रारदारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर माध्यमांशी बोलताना खा.लंके म्हणाले, आमच्याकडे आज लेखी स्वरूपात मोठया प्रमाणावर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.नगर जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध धंदे वाढलेले आहेत. हप्तेखोरी चालू आहे. गुटख्याच्या गाडया सर्रास सोडल्या जातात.अनेक ट्रकचालकांना लुटले जाते.श्रीगोंदे तालुक्यात भोसले नामक पोलीस अधिकाऱ्याने मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन गायीचा गोठा बंद करून त्यांची उपजिविका बंद केली.पोलीसांची धटींगशाही सुरू आहे. तक्रारी घेतल्या जात नाही.पोलीस अधिकारी, कर्मचारी पैसे गोळा करण्यात मश्गुल आहेत. मी ज्यावेळी लोकसभेची उमेदवारी केली त्यावेळी माझ्या फोन नंबरचे कॉल रेकॉर्डींग काढले.ही धक्कादायक माहीती उजेडात आली त्यावेळी पोलीस अधिक्षक तसेच गुन्हे शाखेची चलाखी उजेडात आली.पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची तात्काळ बदली करावी त्यांच्या कडील अतिरिक्त कराभार काढून घेण्यात यावा,ही प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत अवैध व्यवसाय बंद करण्या संदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल असा इशारा खा.लंके यांनी यावेळी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *