मौज-मजा व नशा करण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रवाशाचे अपहरण करुन मारहाणीत जखमी करुन लुटणारे कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद*

 

 

 

नगर प्रतिनिधी: दि १४/७/२०२४ रोजी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आनिल गोरख हाडे वय २९ वर्षे रा. मैदा ता.जि.बीड हे अहमदनगर येथून पुणे बस स्टॅण्ड येथे बीड कडे जाणारे गाडीची बस स्टॅण्ड बाहेरील रोडवर वाट पहात आसताना काळया रंगाचे सलेंडर मोटार सायकलवर दोन अनोळखी ईसमांनी त्यांना बळजबरीने बसवुन आमी एरीयामध्ये नेवुन त्यास जबर मारहाण करुन त्याचे मोबाईल पॅन कार्ड, आधारकार्ड, एटीम कार्ड व खिशातील ९००/- रुपये कैश व एटीएमचा पासवर्ड मारहाण करुन घेवुन नंतर त्यातील १,४४,००/-रुपये काढून घेतले आहेत वगैरे मजकुरच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशनला दिनांक २१/७/२०२४ रोजी गु.र.नं । ८१७/२०२४ भारतीय न्याय सहींता २०२३ चे कलम १४०(३), ३०९ (६), प्रमाणे गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरिक्षक श्री. प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्हा हा बबल्या ऊर्फ अनिकेत शंकर वाकळे व त्याचा साथीदार यांनीच केला आहे. व गुन्हा केल्या नंतर त्यातील एक पसार झालेला आहे, अशी बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस आमदार यांना तात्काळ आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केले असता यातील आरोपी नामे १) बबल्या ऊर्फ अनिकेत शंकर वाकळे वय २३ वर्ष रा. काटवण खंडोबा महात्मा फुले वसाहत येथे मिळुन आला त्यास ताब्यात घेवुन त्याचे कडे सदर गुन्ह्याबाबत अधिक सखोल चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा मी व २) सुरज ऊर्फ राजु केदारे रा. बोल्हेगांव अ नगर (फरार) याने नशा करुन मौजमजा करण्यासाठी व गर्लफ्रेंडला महागड्या भेटवस्तु देण्यासाठी मिळुन केला आहे. अशी कबुली दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोसई शितल मुगडे हया करित आहेत.

 

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सो, यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे सो गुन्हेशोध पथकाचे पोहेकाँ योगश भिंगारदिवे, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना अविनाश वाकचौरे, पोना सलीम शेख, पोकाँ अभय कदम, पोकाँ अमोल गाडे, पोकाँ सतिष शिंदे, अतुल काजळे सोमनाथ राऊत मोबाईल सेलचे पोकाँ राहुल गुंडु यांनी सदरची कारवाई केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

01:33