जामिनावर बाहेर असलेला गुन्हेगार आकाश दंडवतेची गुन्ह्यांची मालिका सुरूच, मारहाण करत खंडणीची मागणी गुन्हा दाखल
अहिल्यानगर: मागील एका गंभीर प्रकरणात आरोपी असलेला आकाश बबन दंडवते (रा.सावेडी) जामिनावर सुटल्यानंतर ही त्याच्या गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे त्याने त्याच्या तीन अनोळखी साथीदारांसह नागापूर एमआयडीसी येथील एक्साइड कंपनीत कच्चामाल उत्तरविण्यासाठी आलेल्या वाहनचालकास दमदाटी करून मारहाण करत खंडणी मागितल्याची घटना गुरुवारी (दि.७) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आकाश बबन दंडवते व इतर अनोळखी तीन…
