विळद, ता. नगर परिसरात पर्यटकावर दरोडा टाकुन लुटणारी टोळी जेरबंद,
स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.
—————————————————————————————————————
नगर प्रतिनिधी: प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 3 ऑगस्ट, 2024 रोजी फिर्यादी श्री. वैभव उत्तम सहजराव वय 21, रा. जांब, जिल्हा परभणी हल्ली रा. पंचवटी नगर, भिस्तबाग चौक, सावेडी अहमदनगर हे विळद परिसरातील गवळीवाडा वॉटर फॉल, ता. नगर येथे फिरण्यास गेले असता अनोळखी 5 इसमांनी फिर्यादीस लाथाबुक्या व काठीने मारहाण करुन 6,900/- रुपये किंमतीचा मोबाईल फोन, चांदीची चैन, अंगठी व रोख रक्कम दरोडा चोरी करुन चोरुन नेले बाबत एमआयडीसी पो.स्टे.गु.र.नं. 627/24 भारतीय न्याय संहिता कलम 310 (2) प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
नमुद घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थागुशा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.
सदर आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोहेकॉ/गणेश भिंगारदे, संतोष लोढे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना/फुरकान शेख, पोकॉ/रविंद्र घुगांसे, आकाश काळे, मयुर गायकवाड, किशोर शिरसाठ, रोहित येमुल, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, चापोहेकॉ/ चंद्रकांत कुसळकर व चापोकॉ/अरुण मोरे अशांचे पथक नेमुन अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गुप्तबातमीदारा मार्फत एमआयडीसी, बेल्हेगांव, विळद व राहुरी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असतांना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत वर नमुद गुन्हा हा इसम नामे सुरेश रणजीत निकम व विलास बर्डे दोन्ही रा. कात्रड, ता. राहुरी यांनी त्यांचे इतर 3 साथीदारांसह केला असुन ते कात्रड गांवातील स्मशानभुमी जवळ बसलेले आहेत आता गेल्या मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन बातमीतील ठिकाणी कात्रड, ता. राहुरी येथील स्मशानभुमी जवळ जावुन खात्री करुन आवश्यक कारवाई करणे बाबत कळविले.
पथकाने लागलीच राहुरी तालुक्यातील कात्रड गांवातील स्मशानभुमी जवळ जावुन पहाणी केली असता काही इसम एका झाडा खाली गप्पा मारत बसलेले दिसले. पथकाने त्यांना घेराव घालुन शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यातील संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) सुरेश रणजीत निकम वय 30, 2) विलास संजय बर्डे वय 22, 3) रोहित संदीप शिंदे वय 19 सर्व रा. कात्रड, ता. राहुरी, 4) ज्ञानेश्वर भानुदास बर्डे वय 21, मुळ रा. कोंढवड, ता. राहुरी व हल्ली रा. बोल्हेगांव, ता. नगर व 5) शांताराम भानुदास काळकुंड वय 19, रा. दत्त मंदीरा शेजारी, निंबळक, ता. नगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितल्याने पाचही आरोपींना एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.