*जिल्हा रुग्णालयातुन पसार झालेला अट्टल गुन्हेगार किरण कोळपे कोतवाली पोलीसांच्या जाळ्यात*
नगर प्रतिनिधी: दिनांक ०९/०८/२०२४ रोजी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे अँड नाजमीन वजीर बागवान यांनी फिर्याद दिली की, दि ०८/०८/२०२४ रोजी मी राहत असलेल्या घरात आरोपी नामे किरण बबन कोळपे रा विळद ता नगर याने अनाधिकृत पणे प्रवेश करुन माझ्या घरातील आरोपी किरण कोळपे याचे विरोधात २०२३ मध्ये राहुरी पोलीस स्टेशन येथे दरोड्याचा गुन्हयातील दाखल वकिल पत्र व सदर गुन्ह्यात त्याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती त्या गुन्ह्याचे कागदपत्र हे ठेवलेले होते ते व त्यांचे घरातील ठेवलेले १,९२,७००/- रु असा ऐवज चोरुन नेला होता, सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर त्यास कोतवाली पोलीसांनी त्यास ताब्यात घेवुन अटक करणे असल्याने सिव्हील हॉस्पीटल अ नगर येथे वैद्यकीय तपासणी करणे करीता घेवुन गेले असता त्याने सिव्हील हाँस्पीटल येथुन पळ काढला होता त्या मुळे त्याचे विरोधात पुन्हा तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचा आरोपी हा सिव्हील हॉस्पीटल येथुन पसार झाल्या नंतर तो स्वताचे अस्तीत्व लपवत पळत फिरत होता, त्याची माहीती पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांना मिळताच त्यांनी एक पथक तयार करुन त्याचे शोधार्थ रवाना केले त्या पथकाने वेशांतर करुन पसार झालेल्या आरोपीस विठ्ठलवाडी कल्याण येथुन मोठ्या शिताफिने ताब्यात घेतल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी खुष होवुन पुन्हा एकदा कोतवालीच्या टिमला बक्षीस जाहीर केले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती सो यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उप निरिक्षक प्रविण पाटील,
गुन्हे शोध पथकाचे पोहेकाँ योगेश भिंगारदिवे, पोहेकाँ विशाल दळवी, पोना सलीम शेख, पोना याकुब सय्यद, पोकाँ अभय कदम, पोकाँ अमोल गाढे, व दक्षिण मोबाईल सेलचे पोकाँ राहुल गुंडु,तसेच कोतवाली पोस्टे चे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.