अहमदनगर आकाशवाणीचा लोकप्रिय कार्यक्रम नगरी नगरी पुन्हा सुरु करा – श्रोत्यांची मागणी

अहमदनगर आकाशवाणीचा लोकप्रिय कार्यक्रम

नगरी नगरी पुन्हा सुरु करा – श्रोत्यांची मागणी

अहमदनगर – येथील आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे संध्याकाळचे प्रसारण पुन्हा सुरु होत आहे . त्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेला नगरी नगरी कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात यावा अशी मागणी वांबोरी , शिर्डी , राहुरी आदि तालुक्यातील श्रोत्यांनी केली आहे .

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की , नगरी नगरी हा कार्यक्रम आकाशवाणी अहमदनगर केंद्रावर सुरु होता . किरण डहाळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनहिताचे प्रश्न त्यांच्या तिरकस शैलीतून मांडायचे . याशिवाय स्थानिक बोली भाषेत अर्थात नगरी बोली भाषेत सादर केला जाणारा हा एकमेव कार्यक्रम होता . दर सोमवारी सकाळी नऊ वाजता श्रोते या कार्यक्रमाची वाट पहायचे . मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा कार्यक्रम अचानक बंद करण्यात आला . यासंदर्भात किरण डहाळे यांच्याशी संपर्क साधला असता कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेण्यात आला होता , असे त्यांनी सांगितले .

आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र दासरी यांनी या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन किरण डहाळे यांचा नगरी नगरी कार्यक्रम सुरु करण्यात यावा अशी श्रोत्यांची मागणी आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *