अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करणाऱ्या रोडरोमिओवर पोस्को दाखल;मुलींनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे या सपोनी-प्रल्हाद गीते
अहील्यानगर (दि.२८ प्रतिनिधी):-नगर जामखेड रोडवरील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या तरुणावर नगर तालुका पोलिसांनी विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मनीष सुनील लबडे (रा. पाथर्डी तालुका) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरील आरोपी हा फिर्यादी मुलीला वारंवार कॉलेजमध्ये येऊन त्रास देत होता छेडछाड करत होता सततच्या होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून मुलीने वडिलांना सदरील घडलेली बाब सांगितली. मुलीच्या वडिलांनी तात्काळ नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनी. प्रल्हाद गीते यांची भेट घेऊन घडलेली हकीकत सांगितली.सपोनी. गीते यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आणि त्या आरोपीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याने फिर्यादी मुलीची फिर्याद नोंदवून घेत आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
