कै.बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विविध मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन 

कै.बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विविध मान्यवरांच्या हस्ते थाटात

उद्घाटन

 

 

 

अहिल्यानगर (दि.३० जानेवारी):-शहरातील वाडियापार्क येथील कै.बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे दि.२९ जानेवारी रोजी उद्घाटन दिमाखदार सोहळ्यात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेचे एकदम शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल आ.संग्राम जगताप यांच्याकडून कुस्तीला नेहमी दिलं जात असलेल्या पाठबळाचे कौतुक केले.तसेच यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की,महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर मध्ये होत असल्याचा सर्वाधिक आनंद मला होत आहे.या स्पर्धेचा दर्जा वाढवण्यासाठी व महाराष्ट्राबाहेर देखील स्पर्धेचे नावलौकिक वाढावे यासाठी स्पर्धेचे बारकाईने नियोजन केले आहे.अनेक दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी हातभार लावला आहे.माझे आजोबा स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप हे कुस्तीचे शौकीन होते. त्यांनी कायम कुस्तीगीरांना मदत व सहकार्य केले आहे. त्यांच्या पश्चात वडील व चुलत्यांनी हे काम केले. मी व भाऊ आता ही परंपरा पुढे चालवत आहोत याचा आनंद मला वाटतो.लाल माती नम्रपणा शिकवणारी आहे.त्यामुळे जास्तीत जास्त कुस्तीगीरांनी लाल मातीशी जोडावे व ही परंपरा जपावी.

महाराष्ट्र केसरी किताब विजेत्यास जशी शासकीय नोकरी मिळते त्याच पद्धतीने द्वितीय व तृतीय येणारया मल्लास ही शासकीय नोकरीस सामावून घ्यावे अशी मागणी शासनाकडे करणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने वाडियापार्क क्रीडा संकुल साठी ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील पंधरा कोटी प्राप्त झाले आहेत.भविष्यात भव्य व अद्यावत क्रीडासंकुल येथे उभे राहणार आहे. क्रीडा क्षेत्राला कायम चालना व प्रोत्साहन देत आहे.यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी,आयुक्त यशवंत डांगे,माजी आमदार अरुणकाका जगताप,भाजपाचे महेंद्र गंधे,अभय आगरकर, संपत बारस्कर,सुभाष लोंढे,अनिल शिंदे, हिंदकेसरी योगेश दोडके,महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे,अशोक शिर्के,सईद चाऊस आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस,भाजप, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी यांसह हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *