व्यापार्यांच्या जमीनीवर तालुक्यात ताबेमारी व्यापार्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट
अहिल्यानगर (दि.३० प्रतिनिधी):-नगर तालुक्यात जमिनी घेतलेल्या शहरातील व्यापार्यांच्या त्या जमीनीवर ताबेमारी करण्यात येत असल्याचा प्रकार आता समोर आला आहे. त्यामुळे व्यापारी बांधवांनी शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली.नगर शहरातील व्यापार्यांच्या जमिनीवर नगर तालुयातील वाटेफळ येथील अनिल वालचंद गांधी,विजय वालचंद गांधी बाबुर्डी येथे सुदर्शन डुंगुरवाल आणि वाकोडी येथे…
